कोल्हापूर : महापालिका आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांतर्फे प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र अंतर्गत येणाऱ्या भागांमध्ये शनिवारी दैनंदिन सर्वेक्षणात ८५१ घरांचे सर्वेक्षण, तर ३६७४ नागरिकांची तपासणी करण्यात आली.
शहरामध्येही कोरोना संसर्ग रुग्णांची संख्या वाढू लागल्यामुळे महापालिका आरोग्य कर्मचाऱ्यांतर्फे ११ नागरी आरोग्य केंद्र अंतर्गत सर्वेक्षण व नागरिकांची तपासणी करण्यात आली. यात बाबूजमाल रोड, वांगी बोळ, बुधवार पेठ, ब्रम्हपुरी, नाना पाटील नगर, यादवनगर, शाहुपुरी, राजारामपुरी, प्रतिभानगर, शाहुनगर, राजेंद्र नगर, जरगनगर, रामानंद नगर, नेहरुनगर, सुभाष नगर, साळोखे पार्क या ठिकाणी घरोघरी जाऊन करण्यात आले. यात ८५१ घरांचे सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये ३६७४ नागरिकांचीही तपासणी करण्यात आली. त्यातील ३२८ जणांचे स्वॅब घेण्यात आले. चार नागरिकांना ताप, सर्दीची लक्षणे आढळली.