कोल्हापूर : मंगळवार पेठ, सनगर गल्लीतील सुरेश भाऊराव पाटील (वय ६३) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे.
शांताबाई नवाळे
कोल्हापूर : नरके काॅलनी (कळंबा, ता. करवीर) येथील शांताबाई भालचंद्र नवाळे (वय ८७) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
धनपाल पाटील
कोल्हापूर : लालबहादूर शास्त्रीनगरातील धनपाल बाळगोंडा पाटील (वय ९१) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दाेन मुलगे असा परिवार आहे.
धोंडूबाई सावंत
कोल्हापूर : आंबवणे (ता. भुदरगड) येथील धोंडूबाई बाबूराव सावंत (वय ८०) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
बाळकृष्ण माने
कोल्हापूर : शुक्रवार पेठ, जोशी गल्लीतील बाळकृष्ण पांडुरंग माने (वय ८१) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, मुली, जावई, सुना, नातवंडे असा परिवार आहे. ते जोशी समाजाचे कार्यकर्ते मुरलीधर माने यांचे वडील होत.
लक्ष्मी फडतारे
कोल्हापूर : साने गुरुजी वसाहतीतील लक्ष्मी आनंदराव फडतारे (वय ७५) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मोठा परिवार आहे. त्या महापालिकेच्या शाळेतून कलाशिक्षक म्हणून निवृत्त झाल्या होत्या. जिल्हा परिषदेतील वरिष्ठ सहायक विकास फडतारे यांच्या त्या मातोश्री होत.