शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

‘दौलत’च्या कामगारांना कुपेकरांचा पाठिंबा

By admin | Updated: March 3, 2015 00:27 IST

आंदोलन सुरूच : राजीनाम्यासाठी संचालकांना शनिवारपर्यंत मुदत, तहसीलदारांना निवेदन

चंदगड : दौलत साखर कारखाना सुरू करावा व शेतकऱ्यांसह कामगारांचे थकीत पैसे द्यावेत, या मागणीसाठी दौलत बचाव संघर्ष समितीच्यावतीने सुरू केलेल्या धरणे आंदोलनाला सोमवारी आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी पाठिंबा दिला. दरम्यान, संचालक मंडळाने दौलत सुरू करण्यासाठी काय प्रयत्न केले याचा खुलासा करावा यासाठी संचालक, कामगार व कृती समितीच्या सदस्यांची बैठक बोलवावी या मागणीचे निवेदन प्रा. एन. एस. पाटील, अ‍ॅड. संतोष मळवीकर, डॉ. बी. एल. पाटील, अर्जुन कुंभार यासह आंदोलकांनी तहसीलदारांना दिले.दौलत कारखाना गेली चार वर्षे बंद आहे. तो सुरू करावा या मागणीसाठी आंदोलन कृती समितीतर्फे डिसेंबर २०१४ मध्ये आंदोलन सुरू केले होते. पण, व्यवस्थापनाने दौलत सुरू करायला आलेल्या पार्टीला पैसे उभे करण्यासाठी पुरेसा कालावधी द्यावा, अशी मागणी केल्याने आंदोलन तात्पुरते स्थगित केले होते. मात्र, चौथा गळीत हंगाम संपला तरी कारखाना सुरू करण्यासंबंधी संचालक मंडळाने कोणतीच हालचाल केली नाही. त्यामुळे दौलत कामगार संघटना, सिटू कामगार संघटना व जनआंदोलन कृती समितीच्यावतीने संयुक्त आंदोलन सुरू केले आहे. रविवारी कारखाना स्थळावर शेतकरी कामगार यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत बुधवारी संचालक मंडळासोबत तहसील कार्यालयात बैठक घ्यावी, त्या बैठकीत गोपाळराव पाटील व संचालक मंडळ हजर राहिले नाहीतर त्यांचा राजीनामा घेणे, केंद्रीय कृषिमंत्री, सचिव, सहकारमंत्री यांना भेटण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली होती. याचाच एक भाग म्हणून सोमवारी तहसीलदार यांना निवेदन दिले.यावेळी आमदार कुपेकर यांनी ९ मार्चला सुरू होणाऱ्या विधानसभेच्या अधिवेशनात ‘दौलत’संबंधी आपण आवाज उठवू, असे सांगून न्यायालयीन वादात अडकलेल्या २७ कोटी रुपये शेतकरी व कामगारांना देण्यासंदर्भात आपण प्रयत्न करू असे सांगितले, तर प्रा. एन. एस. पाटील यांनी दौलतचा लढा निर्णायक वळणावर आला आहे. त्यामुळे कामगार व शेतकरी यांनी आता मागे न राहता आंदोलनात सक्रीय व्हावे, असे आवाहन केले. अ‍ॅड. मळवीकर यांनी आता ‘आर या पार’ची लढाई केली पाहिजे. संचालक मंडळाचे राजीनामे तर घेऊच, पण त्यांच्यावर कर्जाची जबाबदारी निश्चित करण्याची जबाबदारी सभासद, कामगारांची असल्याचे सांगितले.आंदोलनात प्रभाकर खांडेकर, दिवाकर पाटील, महादेव गावडे, सुरेश हरेर, सुरेश सावंत-भोसले, सुरेश भातकांडे, महादेव फाटक, अशोक चांदेकर, संजय देसाई, नामदेव कुट्रे, प्रदीप पवार, अर्जुन कुंभार, केन, अकौंंट, सुरक्षा, वर्कशॉप विभागातील कर्मचारी या सहभागी झाले होते.