शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

बच्च कडूंच्या समर्थनार्थ ‘प्रहार’चे अन्नत्याग आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 23:11 IST

कोल्हापूर : दिव्यांग बांधवांच्या मागण्या अद्याप शासनस्तरावर प्रलंबित आहेत. त्याच्या निषेधार्थ आमदार बच्चू कडू यांनी शुक्रवारपासून अमरावती येथे अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे.

ठळक मुद्दे दिव्यांग बांधवांना देण्यात येणारे ६०० रुपये मानधन वाढवून १५०० रुपये करण्यात यावे दिव्यांग वित्त महामंडळाच्या कर्जाबाबतच्या जाचक अटी रद्द कराव्यात.

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : दिव्यांग बांधवांच्या मागण्या अद्याप शासनस्तरावर प्रलंबित आहेत. त्याच्या निषेधार्थ आमदार बच्चू कडू यांनी शुक्रवारपासून अमरावती येथे अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ‘प्रहार अपंग क्रांती आंदोलन’तर्फे कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शुक्रवारपासून दिव्यांग बांधवांतर्फे अन्नत्याग आंदोलन सुरू करण्यात आले.

आमदार बच्चू कडू यांनी दिव्यांग, अनाथ, शेतकरी व विधवांच्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी शासनाविरोधात शुक्रवारपासून अमरावती येथील संत गाडगेबाबा समाधिस्थळ येथे बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. त्याला पाठिंबा म्हणून राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर दिव्यांग बांधवांनीही आंदोलन सुरू केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू करण्यात आले. शासनाकडून जोपर्यंत प्रलंबित मागण्यांबाबत ठोस निर्णय घेतला जात नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील, असा इशारा यावेळी देण्यात आला.

मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांना सादर करण्यात आले. १९९५ च्या कायद्याची अंमलबजावणी न करणाºया अधिकाºयांवर कार्यवाही करून सर्व जिल्हा परिषद, महानगरपालिका, पंचायत समिती यांनी तीन टक्के अपंग निधी तातडीने वितरित करावा. दिव्यांग बांधवांना देण्यात येणारे ६०० रुपये मानधन वाढवून १५०० रुपये करण्यात यावे. मानधनाकरिता २१००० रुपये असणारी उत्पन्नाची अट शिथिल करून एक लाख रुपये करावी, त्याचबरोबर दिव्यांगांना समप्रमाणात मानधन वितरित करावे. दिव्यांगांना कर्जमाफी देऊन दिव्यांग वित्त महामंडळाच्या कर्जाबाबतच्या जाचक अटी रद्द कराव्यात. दिव्यांग-अव्यंग योजनेचे प्रोत्साहन अनुदान वाढवून एक लाख रुपये करावे, अशा विविध मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.आंदोलनात देवदत्त माने, संदीप दळवी, अफजल सरकार, संजय जाधव, रामचंद्र वडेर, अविनाश केकरे, आशितोष डोंगरे, आदींसह दिव्यांग सहभागी झाले होेते. दिव्यांग बांधवांच्या मागण्यांसंदर्भात आमदार बच्चू कडू यांनी अमरावती येथे अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. त्याला पाठिंबा देण्यासाठी ‘प्रहार अपंग क्रांती आंदोलन’तर्फे कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शुक्रवारपासून अन्नत्याग आंदोलन सुरू करण्यात आले.