शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

‘खंडपीठा’ला ८५ संघटनांचा पाठिंबा

By admin | Updated: April 10, 2017 00:47 IST

बैठकीत निर्णय; राजर्षी शाहू सामाजिक सलोखा मंचची स्थापना; एकोपा राखण्याचा निर्धार

कोल्हापूर : कोल्हापुरात खंडपीठ व्हावे, या मागणीसाठीच्या लढ्याला जिल्ह्यातील विविध धर्मीय, समाज अशा ८५ संघटनांनी रविवारी पाठिंबा दिला. विविध समाजातील एकोपा कायम राखण्यासह कोल्हापूरचा हा सामाजिक आदर्श देशभर पोहोचविण्यासाठी ‘राजर्षी शाहू सामाजिक सलोखा मंंच’ची स्थापना करण्यात आली.येथील मुस्लिम बोर्डिंगच्या सभागृहात ‘सामाजिक सलोखा मंच’तर्फे विविध धर्मीय, समाज संघटनांची बैठक झाली. यात प्रारंभी बैठकीचे अध्यक्ष पापाभाई बागवान यांच्या हस्ते भगवान महावीर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. मल्हार सेनेचे बबन रानगे यांनी ‘सामाजिक सलोखा मंच’ची स्थापना आणि खंडपीठासाठी सुरू असलेल्या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी बैठक आयोजित केली असल्याचे प्रास्ताविकातून स्पष्ट केले. अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष व मंचचे कार्यवाह वसंतराव मुळीक यांनी खंडपीठ हा कोल्हापूरचा ज्वलंत प्रश्न आहे. या ठिकाणी खंडपीठ होण्यासाठी आपण आग्रही राहूया, असे आवाहन केले. शिवाय कोल्हापूरची सामाजिक एकजूट, एकोपा कायम राखणे, तो वाढविण्यासाठी सर्व समाज-संघटनांची शिखर संस्था असणाऱ्या ‘राजर्षी शाहू सामाजिक सलोखा मंच’ची स्थापना करण्याचा मुद्दा मांडला. त्याला विविध धर्मीय, समाज संघटनांच्या पदाधिकारी, प्रतिनिधींनी हात उंचावून आणि ‘कोल्हापुरात खंडपीठ झालेच पाहिजे,’ या घोषणेद्वारे निर्धार व्यक्त करीत पाठिंबा दिला. यानंतर कोल्हापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश मोरे म्हणाले, खंडपीठासाठी गेल्या ३२ वर्षांपासून सहा जिल्हे आणि ६३ तालुक्यांतील वकिलांनी लढा दिला आहे. यावर्षी आम्ही हा लढा लोकाभिमुख करण्यासाठी ‘नागरी कृती समिती’ची स्थापना केली. आमच्या लढ्याला विविध ८५ धर्मीय, समाज संघटनांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे बळ मिळाले आहे. मुख्यमंत्र्यांनी उच्च न्यायालयाला पत्र देण्याची दिलेली ग्वाही हा आपला एका टप्प्यावरील विजय आहे. अंतिम यश मिळेपर्यंत आपण सर्वांचे पाठबळ कायम राहावे. बैठकीस बाळासो भोसले, अ‍ॅड. विवेक घाटगे, किशोर घाटगे, कादर मलबारी, शामू मुधोळ, शिरीष देशपांडे, फिरोज उस्ताद, शंकर शेळके, दिलीप भुर्के, श्रीपाल जर्दे, सुरेश रोटे, राजकुमार चौगुले, हिदायत मुल्ला, एन. एन. पाटील, राकेश निल्ले, जी. एस. पाटील, जयवंत पलंगे, संजय आवळे, सुनीता लोहार, ऊर्मिला सुतार, हेमलता कोळी, आनंद साळोखे, शरद साळुुंखे, अवधूत पाटील, विजयकुमार शेट्टी, जगमोहन भुर्के, अनिल गिरी, अरुण कुराडे, बाबूराव बोडके, अशोक घाडगे, गोरखनाथ गवळी, राघू हजारे, अनिल कांबळे, महादेव जाधव, भाऊसो काळे, बाजीराव गायकवाड, आनंद म्हाळुंगेकर, काशिनाथ रानगे, सतीश कुंभार, अशोक माळी, आदी उपस्थित होते. उमेश पोर्लेकर यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)--------------------कोण, काय, म्हणाले...* राजशेखर तंबाखे : कोल्हापुरात खंडपीठ आणण्यासाठी जोर लावूया.* प्राचार्य श्रीधर हेरवाडे : एखाद्याचे मन दुखावणे म्हणजे हिंसा आहे. ‘खरे ते माझे’ असा आग्रह माणसांनी धरावा.* संजय शेटे : मुख्यमंत्र्यांनी कोल्हापूरबाबत दिलेला शब्द पाळावा.* एम. एम. कुरेशी : खंडपीठासाठी सर्वांनी एकजुटीने लढा देऊया.* वसंतराव मुळीक : ‘सलोखा मंच’च्या माध्यमातून दर तीन महिन्यांतून बैठक घेऊन विविध समाजातील प्रश्न आणि चांगल्या गोष्टींवर चर्चा केली जाईल.* गणी आजरेकर : खंडपीठाबाबतचे आंदोलन हे जनतेचे आहे. एन. डी. पाटील सरांची समजूत काढून लढा यशस्वी करूया.* कादर मलबारी : या आंदोलनाचे नेतृत्व करण्यासाठी प्रा. एन. डी. पाटील सर यांना पुन्हा साकडे घालूया.* उत्तम कांबळे : खंडपीठासाठी संघटितपणे लढा देऊया.*आशा कुकडे : महिला विषयक कायद्यांची अंमलबजावणी व्हावी.या संघटनांचा पाठिंबा अखिल भारतीय मराठा महासंघ, छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड, परीट, खाटीक, गवळी, ओतारी, कुंभार, घिसाडी समाज, कंजारभाट, सोनार समाज, जिल्हा सर्वोदय मंडळ, धनगर समाज महासंघ, स्वातंत्र्यसैनिक संघटना, ख्रिस्ती युवा शक्ती, सुतार-लोहार समाज बहुउद्देशीय संस्था, कोळी समाज युवा मंच, सिटीझन फोरम, कोल्हापूर ओबीसी बारा बलुतेदार संघ, जैन बोर्डिंग, दक्षिण भारत जैन सभा, महाराष्ट्र अल्प ख्रिस्ती विकास परिषद संस्था, सुन्नत मुस्लिम जमात लीग, माजी सैनिक महासंघ, मल्हारसेना, जनलोक पार्टी, दसनाम गोसावी, माळी समाज, मुस्लिम पंचायत, ओतारी समाज, आदींनी बैठकीतील निर्णयाला एकमताने पाठिंबा दिला.