शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

पुरवणी तपास अहवाल २९ रोजी सादर होणारदिनेश

By admin | Updated: March 23, 2016 00:29 IST

बारी यांची माहिती : समीर गायकवाडच्या जामीन अर्जावर आज निर्णय

कोल्हापूर : ज्येष्ठ नेते अ‍ॅड. गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणातील संशयित आरोपी समीर गायकवाड याच्या जामीन अर्जावर जिल्हा व सत्र न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश एल. डी. बिले आज, बुधवारी निर्णय देणार आहेत. पोलिसांचा तपास अद्यापही अपूर्ण असल्याने समीर गायकवाड याचा जामीन फेटाळण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान, या तपासाचा पुरवणी अहवाल येत्या २९ मार्चला सत्र न्यायालयात सादर केला जाईल, असे अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. दिनेश बारी यांनी पत्रकारांशी बोलताना मंगळवारी सांगितले. पानसरे यांच्या हत्येप्रकरणी सीबीआय, एसआयटी व सीआयडी (कर्नाटक) या तपास यंत्रणांत समन्वय झाल्याने नवे पुरावे पुढे येण्याची शक्यता आहे. दि. २८ मार्चला मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होत आहे. त्यामुळे तपास पूर्ण होईपर्यंत सुनावणी तहकूब ठेवावी, असा विनंती अर्ज सरकार पक्षाने सत्र न्यायालयास सादर केला होता. त्यावर आरोपी समीर गायकवाड याच्याविरोधात दोषारोप निश्चित करण्याची सुनावणी न्यायाधीश बिले यांनी दि. २९ मार्चपर्यंत तहकूब केली. सरकार पक्षाने, ‘तपास सुरू आहे, दोषारोप निश्चित करू नका. तपास पूर्ण होईपर्यंत सुनावणी तहकूब करावी’, अशी विनंती केली आहे. हीच कारणे धरून आरोपीचे वकील समीर पटवर्धन यांनी आरोपीला जामीन मिळावा, यासाठी दुसऱ्यांदा न्यायालयास अर्ज सादर केला. त्यावर न्यायालयाने दि. १४ मार्चला दोन्ही बाजूंच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकून दि. २३ मार्चला जामिनाबाबत अंतिम निर्णय दिला जाईल, असे सांगितले. (प्रतिनिधी)हत्याप्रकरणी अहवालासाठी २0 दिवसपानसरे हत्येप्रकरणी पुरवणी तपास सुरू आहे, असे सांगितले जात आहे. तपास यंत्रणेने आतापर्यंत काय तपास केला, याबाबतचा अहवाल उच्च न्यायालयास सादर करताना सत्र न्यायालयासही सादर करावा, अशा सूचना न्यायाधीश बिले यांनी अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. बारी यांना दिल्या होता. हा अहवाल सादर करण्यासाठी न्यायालयाने तपास यंत्रणेला २० दिवसांचा कालावधी दिला आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार तपास अहवाल सादर करणार काय, अशी विचारणा प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी डॉ. बारी यांना केली. त्यावर त्यांनी २९ मार्चच्या सुनावणीस अहवाल सादर केला जाईल, असे सांगितले.