शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

शिराळ्याच्या ‘चिन्मय’ची आकाशाला गवसणी!

By admin | Updated: December 14, 2014 23:58 IST

वैमानिक प्रशिक्षणासाठी निवड : देशात सातवा क्रमांक, चौदाव्या प्रयत्नात यश

विकास शहा- शिराळा - प्रयत्नांती परमेश्वर, अर्थात प्रयत्न केल्यावर काहीही अवघड नसते, ही उक्ती शिराळ्याच्या सुपुत्राने भारतीय हवाई दलात वैमानिकपदी निवड होण्यासाठी अथक् परिश्रम घेऊन सार्थ करून दाखविली. चिन्मय श्रीनिवास खुर्द असे या तरु णाचे नाव. देशातील ११ जणांची वैमानिक प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली. चिन्मयने यामध्ये सातवे स्थान प्राप्त केले. विशेष म्हणजे यासाठी त्याने तेरावेळा प्रयत्न केले होते. अखेरीस चौदाव्यावेळी त्याच्या प्रयत्नाला यश आले. अवघ्या २२ व्या वर्षी एअरफोर्स अ‍ॅकॅडमी, हैदराबाद येथे १९७ च्या वैमानिक (पायलट) या दीड वर्षाच्या उड्डाण प्रशिक्षणासाठी त्याची निवड झाली आहे.खुर्द कुटुंबियांपैकी पांडुरंग तुकाराम खुर्द, गोपाळ तुकाराम खुर्द हे दोघे भाऊ निवृत्त मेजर होते. त्यांचा वारसा घेऊन चिन्मयने अपयशाला सामोरे जाण्याचा धडा आजोबांकडूनच घेतला. शिराळा येथे चिन्मयचा जन्म झाला. चिन्मयचे दहावीपर्यंतचे शिक्षण शिराळ्याच्या विद्याप्रबोधिनी प्रशालेत मराठी माध्यमातून पूर्ण केले. त्याचे वडील श्रीनिवास हे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात कॉम्प्युटर प्रोग्रॅमर म्हणून, तर आई स्वाती या गृहिणी. शिराळा शिंपी समाजाचे अध्यक्ष विलास खुर्द हे त्याचे काका, तर धाकटा भाऊ दहावीत शिकत आहे.चिन्मयने दहावीत शिकत असताना नॅशनल डिफेन्स अ‍ॅकॅडमी (एनडीए) मध्ये प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला. बारावीनंतर २०१० मध्ये त्याची एनडीएच्या हवाई दलासाठी निवड झाली. त्यावेळी गुणवत्ता यादीत तो ६२६ व्या स्थानी होता. मात्र ४५० विद्यार्थ्यांची निवड केल्यामुळे चिन्मयची संधी हुकली. बारावीनंतर पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात बी.एस्सी.ला प्रवेश घेतला. तिथे एनसीसीच्या हवाई दल शाखेत प्रवेश घेऊन ते प्रशिक्षण पूर्ण केले.बी.एस्सी.च्या तिसऱ्या वर्षांपासून त्याने पुन्हा सैन्यदल अधिकारी पदाच्या परीक्षा देण्यास सुरूवात केली. तब्बल बारावेळा लेखी परीक्षा उत्तीर्ण होऊनही तो मुलाखतीत अपयशी ठरला. त्याची जपान सरकारकडून जपानमध्येच व्यवस्थापकीय शिक्षणासाठी मिळणाऱ्या शिष्यवृत्तीसाठी निवड झाली. परंतु जपानला न जाता त्याने फे ब्रुवारीमध्ये पुन्हा कम्बाइन्ड डिफेन्स सर्व्हिसेसची लेखी परीक्षा दिली. यावेळी त्याची मुलाखतीसाठी निवड झाली.मुलाखतीवेळी हवाई दलाच्या वैमानिक पदासाठी तू तेरावेळा नापास झाला आहेस, आम्हाला वाटते तू या क्षेत्रासाठी पात्र उमेदवार नाहीस. तुझं याबद्दल मत काय? असा प्रश्न अधिकाऱ्यांनी विचारला. त्यावेळी चिन्मयने, ‘प्रत्येक अपयशानंतर मी माझी चूक सुधारतो आहे. गरज पडली तर १५ व्या वेळेसही मी मुलाखतीच्या प्रक्रियेस सामोरे जाईन’, असे सडेतोड उत्तर दिले आणि त्याने या मुलाखतीत यश खेचून आणले. ध्येयवेड्या चिन्मयने शिराळा तालुक्याचे नाव उंचावलेच, तसेच युवकांना एक आदर्शही घालून दिला आहे.लहानपणापासून हवाई दलात लढाऊ वैमानिक होण्याचे स्वप्न पाहिले होते आणि आजपर्यंतचा प्रत्येक क्षण मी फक्त तोच विचार करत आलोय. अपयशाच्या काळात मी माझे ध्येय डोळ्यासमोरून हटू दिले नाही. प्रशिक्षण पूर्ण करून हवाई दलात लढाऊ वैमानिक व्हायला आवडेल.- चिन्मय खुर्द