शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सुनील कदम यांचा ‘स्वीकृत’चा मार्ग मोकळा; सरकारकडून ठराव रद्द

By admin | Updated: July 21, 2016 00:56 IST

राजकीय कुस्तीत ताराराणी व भाजप आघाडीने सत्तारूढ दोन्ही काँग्रेसवर मात केली.

कोल्हापूर : महानगरपालिकेतील राजकीय ईर्ष्येतून स्वीकृत नगरसेवक म्हणून सुनील महादेव कदम यांची निवड करण्याबाबतची आयुक्तांची शिफारस बहुमताच्या जोरावर नामंजूर करणाऱ्या कॉँग्रेस व राष्ट्रवादीच्या सदस्यांना राज्य सरकारने बुधवारी दणका दिला. कदम यांची स्वीकृत सदस्याची शिफारस नाकारणे हे कायद्यातील तरतुदीने दिलेल्या अधिकाराच्या मर्यादेबाहेरचे आहे, असे मत नोंदवीत सरकारने महासभेचा ठराव विखंडित (रद्द) केला. त्यामुळे कदम यांचा महापालिकेच्या सभागृहातील प्रवेश खुला झाला. यासाठी झालेल्या राजकीय कुस्तीत ताराराणी व भाजप आघाडीने सत्तारूढ दोन्ही काँग्रेसवर मात केली. कदम यांच्या सभागृहातील प्रवेशाने सत्तारूढ व विरोधी आघाडीतील संघर्ष अधिक पेटणार आहे.महानगरपालिकेतील पाच स्वीकृत सदस्य निवडी करण्याबाबत आयुक्त पी. शिवशंकर यांनी २० फेबु्रवारी २०१६ रोजीच्या महासभेसमोर शिफारस केली होती. सभागृहात बहुमत असलेल्या कॉँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या सदस्यांनी तौफिक मुल्लाणी, मोहन सालपे (कॉँग्रेस), प्रा. जयंत पाटील (राष्ट्रवादी), किरण नकाते (भाजप) यांची शिफारस मंजूर केली; परंतु ताराराणी आघाडीचे सुनील कदम यांची शिफारस बहुमताने नामंजूर केली. यावेळी सभागृहात दोन्ही कॉँग्रेस व ताराराणी आघाडी-भाजपच्या नगरसेवकांनी कायद्याचा काथ्याकूट केला होता. तरीही सुनील कदम यांच्या नावाला कॉँग्रेस-राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी ठाम विरोध केला. कदम यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड करण्याची शिफारस नाकारताना दोन्ही कॉँग्रेसच्या नगरसेवकांनी दोन आक्षेप नोंदविले होते. माजी महापौर तृप्ती माळवी यांच्या लाच प्रकरणात सुनील कदम यांनी त्यांची बाजू घेतली; तसेच त्यांना पदावरून काढून टाकण्याचा ठराव करण्यास मनाई मागणारा दिवाणी न्यायालयात दाखल केला होता. कदम यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना शपथपत्रात गुन्हेगारी पार्श्वभूमी लपविली असा दुसरा आक्षेप होता. त्यामुळे आयुक्त पी. शिवशंकर यांनी राज्य सरकारच्या नगरविकास विभागाकडे मार्गदर्शन मागविले होते. नगरविकासच्या मार्गदर्शनाप्रमाणे आयुक्तांनी शिफारस अमान्य करण्याचा ठराव २० मे २०१६ च्या सभेत फेरविचारार्थ ठेवला; तसेच त्यावर दोन्ही बाजंूनी अभिवेदन करण्यास सांगितले. त्याहीवेळी कॉँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या सदस्यांनी सुनील कदम यांची निवड करण्यास ठाम विरोध करीत वरील आक्षेप पुन्हा नोंदविले. त्यामुळे आयुक्तांनी अभिवेदनाच्या अनुषंगाने ठराव विखंडित करण्यासाठी राज्य सरकारकडे पाठविला होता. बुधवारी नगरविकास विभागाने यासंदर्भात निर्णय दिला. कदम यांची निवड रद्द करण्याबाबत दिलेले एकही कारण लागू होत नाही. कदम यांच्या स्वीकृत सदस्यपदाची शिफारस नाकारणे हे कायद्यातील तरतुदीने दिलेल्या अधिकाराच्या मर्यादेबाहेरचे आहे, म्हणून महासभेने केलेला ठराव विखंडित करण्यात येत आहे, असे नगरविकास विभागाचे उपसचिव अनिष परशुरामे यांनी शासन आदेशात म्हटले आहे. (प्रतिनिधी) केवळ राजकीय द्वेषातून माझ्या नावाला विरोध करण्यात आला. माझी बाजू रास्त होती. राज्य सरकारने आपल्याला योग्य न्याय दिला आहे. बहुमताने काहीही निर्णय घेऊन चालत नाही, हे स्पष्ट झाले.- सुनील कदम, माजी महापौर