शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

सुंदरनगरची भाकरी पोहोचली तिरुपतीला

By admin | Updated: March 17, 2017 23:30 IST

कऱ्हाडनजीक ‘भाकरीचं गाव’ : महिलांना मिळतोय रोजगार; पन्नास कुटुंबांचा व्यवसाय; यात्रा, कार्यक्रमात पोहोचविल्या जातात भाकरी

शंकर पोळ ल्ल कोपर्डे हवेलीरोजगार निर्माण करताना तो टिकाऊ आणि लोकांच्या गरजेचा असावा लागतो. तसेच उत्पादीत मालासाठी हमखास मार्केट असावे लागते. मात्र, स्पर्धेमध्ये उतरताना अनेकांना या गोष्टी जमत नाहीत. परिणामी, संबंधित रोजगार बंद होतो. पार्ले, ता. कऱ्हाड येथील सुंदरनगरच्या महिलांनी मात्र घरातच रोजगाराची संधी उपलब्ध केली असून, या महिलांनी तयार केलेल्या भाकरी आता इतर राज्यांतही पोहोचत आहेत.बनवडीतील काही कुटुंबांचे दहा वर्षांपूर्वी स्थलांतर करून पार्ले हद्दीमध्ये शासनाने त्यांना जागा देऊन पुनर्वसन केले. या कुटुंबांनी या परिसराला ‘सुंदरनगर’ असे नाव दिले. सध्या या सुंदरनगरमध्ये पन्नास कुटुंबे वास्तव्यास आहेत. येथील लोकांचा रोजंदारी हाच मुख्य व्यवसाय होता; पण अलीकडच्या काळात येथील महिला भाकरी करून देण्याचे काम करू लागल्याने या कुटुंबामध्ये आर्थिक प्रगती झाल्याचे दिसून येते. सुंदरनगरमध्ये तयार झालेल्या भाकरीला सध्या मोठी मागणी आहे. काही महिलांनी विद्यानगर, सैदापूर येथे खाणावळी सुरू केल्या आहेत. तर काही महिला कऱ्हाड तालुक्यात एखाद्या मोठ्या कार्यक्रमात भाकरी करून देण्याचे काम करत आहेत. गावोगावच्या यात्रा, राजकीय कार्मक्रम आदी ठिकाणी भाकरी करून देण्याचे काम या महिला करत आहेत.सामाजिक कार्यकर्त्या लक्ष्मी पवारसह काही महिला घरातच भाकरी तयार करून देत आहेत. या बाजरीच्या भाकरी सहलीसाठी, देवदर्शनाला जाताना लोक घेऊन जात आहेत. शाळूच्या भाकरीपेक्षा बाजरीच्या भाकरीला चांगली मागणी आहे. बाजरीची भाकरी एक महिन्यापर्यंत टिकते. याशिवाय प्रवासातही ही भाकरी आरोग्यदायी ठरते. या भाकरी कागदासारख्या असून, त्या वाळल्यानंतरही चवदार लागतात. भाकरीसोबत लक्ष्मी पवार शेंगदाणा चटणी आणि खर्डा करून देत आहेत. या सर्व गोष्टी टिकाऊ आणि चवीला असल्याने बाहेरगावी फिरायला जाणारे लोक त्यांच्याकडून भाकरी घेऊन जात आहेत. तिरुपती बालाजी, तुळजापूर, कोकण, गुजरात, कर्नाटक आदी ठिकाणी सुंदरनगरच्या भाकरी जाऊ लागल्या आहेत. लक्ष्मी पवार यांची स्वत:ची पिठाची गिरण असून, त्या स्वत: दळण दळून भाकरी तयार करतात. पिठामध्ये चवीपुरते मीठ त्या टाकतात. तसेच तिळाचाही त्या समावेश करतात. गरम पाणी ओतून पीठ मळायचे व चुलीवर भाकरी करायच्या, असा त्यांचा दिनक्रम आहे.एक किलो बाजरीच्या पिठात तीस भाकरी तयार होतात. तर इतर ठिकाणी भाकरी करण्यासाठी गेल्यास नगावर किंवा हजेरीवर भाकरी करून दिल्या जातात. ओगलेवाडी, मसूर, उंडाळे, बनवडी, कोपर्डे हवेली, पार्ले, नडशी, कऱ्हाड, मलकापूर, शिरवडे, शहापूर, वडोली निळेश्वर आदींसह गावातील लोक येथील भाकरी टिकाऊ आणि चवीला असल्याने घेऊन जात आहेत. स्वच्छतेला अधिक महत्त्वबाजरीची भाकरी कागदासारखी पातळ असते. वाळल्यानंतर तिची चव चांगली लागते. खर्डा आणि दही याबरोबर भाकरीला चांगली चव येते. भाकरी चुलीवर भाजल्याने चवीत आणखीनच भर पडते. परिसरासह तालुक्यातील अनेक गावांतील लोक येथून भाकरी घेऊन जातात. सुंदरनगरमधील महिला स्वच्छतेला अधिक प्राधान्य देतात. तसेच भाकरीसाठी येथे अ‍ॅडव्हान्स बुकिंगही करावे लागते, हे विशेष.चवीसोबत आयुर्वेदिक महत्त्वहीबाजरीची भाकरी चुलीवर बनवताना वीटा, दगडाची चूल बनविली जाते. तसेच भाकरी भाजण्यासाठी लिंबाचे जळण वापरले जाते. लिंबाच्या जळणावर तयार केलेल्या स्वयंपाकाला आयुर्वेदात मोठे महत्त्व असल्याचे सांगितले जाते. चवीसाठी आणि आरोग्यासाठीही या भाकरी उपयुक्त आहेत. परिसरातील काहीजण महिलांना भाकरी भाजण्यासाठी स्वत:हून जळण पुरवतात.