शहरं
Join us  
Trending Stories
1
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
3
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
4
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
5
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
6
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
7
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
8
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
9
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
10
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
11
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
12
भाडेकरार, भाडेवाढीशिवाय घरे रिकामी करणार नाही; नायगाव बीडीडी प्रकल्पग्रस्तांचा म्हाडाला कडक इशारा
13
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
14
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
15
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
16
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
17
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
18
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
19
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
20
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट

रविवार ठरला ‘गॅझेट्स’ खरेदीचा वार! आज शेवटची संधी

By admin | Updated: March 6, 2017 00:36 IST

‘लोकमत गॅझेट्स एक्स्पो २०१७’ : कोल्हापूरकरांचा उदंड प्रतिसाद; ब्रँडेड वस्तू स्वस्त व विशेष सवलतींच्या आॅफर्समध्ये

कोल्हापूर : लॅपटॉप असो वा डेस्कटॉप; एलईडी टीव्ही असो अथवा घरगुती आटा चक्की याबरोबरच ब्रॅँडेड स्मार्टफोन, कॅमेरा, वीजबचत करणारी यंत्रणा अशा घरातील प्रत्येकासाठी लागणाऱ्या वस्तूंची ‘लोकमत गॅझेट्स एक्स्पो २०१७’ या प्रदर्शनाच्या माध्यमातून खरेदी करीत कोल्हापूरकरांचा रविवार हा ‘खरेदीवार’ ठरला. सर्व इलेक्ट्रॉनिक गॅझेट्सची दुनिया हौशी कोल्हापूरकरांसाठी एकाच छताखाली उपलब्ध करून देणारे हे प्रदर्शन राजारामपुरीतील डॉ. व्ही. टी. पाटील स्मृतिभवन येथे सुरू आहे. प्रदर्शनाचा आज, सोमवार हा शेवटचा दिवस असून, ते सकाळी १० ते रात्री ९ या वेळेत सुरू राहणार आहे.इलेक्ट्रॉनिक्स विश्वातील हे अनोखे प्रदर्शन ‘घरातल्या प्रत्येकासाठी... प्रत्येक घरासाठी’ ही संकल्पना डोळ्यांसमोर ठेवून मांडण्यात आले आहे. विद्यार्थी, गृहिणी, नोकरदार यांच्यासाठी दैनंदिन वापरातील विविध गॅझेट्सच्या असंख्य व्हरायटीज प्रदर्शनाच्या माध्यमातून उपलब्ध झाल्या आहेत.अद्ययावत तंत्रज्ञानावर आधारलेल्या गॅझेट्सचे कुतूहल शमविणारे दक्षिण महाराष्ट्रातील हे पहिलेच प्रदर्शन आहे. त्यात रविवार सुटीचा दिवस असल्याने कोल्हापूरकरांनी या प्रदर्शनाला सहकुटुंब भेट देणे पसंत केले. कॅमेऱ्यामधील लेटेस्ट तंत्रज्ञान, लेन्स याबद्दल माहिती घेण्यासह, लॅपटॉप, डेस्कटॉपमध्ये नवीन काय आहे, याची विचारणा करताना अनेकजण दिसले. स्मार्टफोनमधील नवनवीन अपग्रेडसह, नवीन फिचर्स हाताळण्यासाठी तरुणाईने मोबाईल फोन्सच्या स्टॉलवर गर्दी केली होती. अनेकांनी नव्या फोेनमधून सेल्फी घेत नवनवीन फंक्शन्स वापरून पाहिली. इंटरनेटशिवाय चालणारा वायरलेस सीसीटीव्ही, ब्लू टूथद्वारे चालणाऱ्या म्युझिक सिस्टीमसह, इन्व्हर्टर, प्रिंटरमधील नवीन तंत्रज्ञान, आदींबद्दलच्या शंका विचारत माहितीही घेतली. गृहिणींनी दैनंदिन जीवनात उपयोगी पडणाऱ्या आटाचक्की, रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीनच्या स्टॉल्सना भेट देणे पसंत केले. अनेकांनी आवडीच्या वस्तू खरेदी केल्या; तर या प्रदर्शनाच्या माध्यमातून देण्यात येत असणाऱ्या आकर्षक सवलती, डिस्काउंट्स, अर्थसाहाय्य देण्यात येत असल्याने काहींनी त्यांचे बुकिंगही करून ठेवले. सर्वांसाठी उपयोगी पडतील अशा गॅझेट्सच्या दुनियेचे द्वार प्रदर्शनाच्या माध्यमातून खुले झाले असून, त्यामध्ये ब्रॅँडेड कंपन्यांच्या वैयक्तिक, गृहोपयोगी, सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या, अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारलेल्या वस्तूंचा समावेश आहे. तरी या प्रदर्शनाला हौशी कोल्हापूरकरांनी भेट नामवंत ब्रँडसचा सहभाग‘लोकमत गॅझेट्स एक्स्पो’मध्ये नामवंत ब्रॅँडस्च्या व्हरायटीज उपलब्ध आहेत. त्यामध्ये स्थानिक उत्पादक, वितरक व विक्रेत्यांचाही समावेश असून खरेदीवर आकर्षक सवलती व डिस्काउंटही देण्यात येत आहेत. त्यामध्ये झेबियन (समर्थ कॉम्प्युटर), ब्रदर (लक्ष्मी कॉम्प्युटर), सीटीडीआय (दिशा कॉम्प्युटर), रिकोह (सिम्प्लिसिटी सॉफ्टवेअर अ‍ॅड सर्व्हिसेस), आसूस, एओसी, इप्सन (विप्रास टेक्नोमार्ट), सिक्युरिटी सिस्टीम्स, एओसी, स्मार्ट, एचपी (आदित्य पेरीफिरल्स), लायड (बॅटरी पॉवर सोल्युशन्स), एसर (प्रोफेशनल टेक सोल्युशन्स प्रा. लि), हेल पॉवर सेव्हर, ओम साई एंटरप्रायजेस, सुभाष फोटोज, द नीड, एनपीएव्ही, सॅमसंग प्लाझा-गिरीश सेल्स, जीओनी, व्हीओ, ओप्पो, सॅमसंग (एस. एस. कम्युनिकेशन अ‍ॅँड सर्व्हिसेस) यांचा समावेश आहे.