शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

सुमनताई मंगळवारी अर्ज भरणार

By admin | Updated: March 24, 2015 00:13 IST

बिनविरोधचे आवाहन : सर्वपक्षीय पाठिंबा, तरीही अपक्षांची गर्दी

तासगाव : माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्या निधनाने रिक्त झालेल्या तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकी- साठी राष्ट्रवादीतर्फे मंगळवारी २४ मार्च रोजी आर. आर. पाटील यांच्या पत्नी सुमनताई अर्ज दाखल करणार आहेत. राष्ट्रवादीने केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत सर्वच पक्षांनी सुमनतार्इंना पाठिंबा दिला असला तरी अपक्षांची गर्दी वाढली आहे. त्यामुळे बिनविरोध निवडणुकीसाठी आता अपक्ष उमेदवारांच्या विनवण्या करण्याची वेळ राष्ट्रवादी नेत्यांवर आली आहे. पोटनिवडणुकीसाठी आज, सोमवारी आठ जणांनी १२ अर्ज खरेदी केले. आतापर्यंत ३७ जणांनी ५३ उमेदवारी अर्ज नेले आहेत. दरम्यान, उद्या, मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने श्रीमती सुमनताई पाटील उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हणमंतराव देसाई यांनी दिली.श्रीमती पाटील यांचा अर्ज दाखल करण्यासाठी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, आ. जयंत पाटील, आ. शशिकांत शिंदे, विलासराव शिंदे यांच्यासह पक्षातील पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. भाजप, काँग्रेस, शिवसेना, मनसे, शेतकरी संघटना यांच्यासह सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याबाबत विनंती करण्यात आली असल्याचेही देसाई म्हणाले.तासगाव - कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यापासून ही निवडणूक बहुचर्चित झाली आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी तासगावात येऊन, मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता मेळाव्यात सुमनतार्इंची उमेदवारी जाहीर केली होती. त्यानंतर ‘निवडणूक की बिनविरोध’ हा विषय गेल्या आठवडाभरापासून जिल्ह्यात चर्चेचा ठरला आहे. राष्ट्रवादीने केलेल्या आवाहनानुसार सर्वच पक्षांनी सुमनतार्इंना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. तरीही अपक्षांची गर्दी वाढत आहे. त्यामुळे बिनविरोधच्या प्रयत्नांना अद्याप यश आलेले दिसत नाही. उमेदवारी अर्ज खरेदी करणे व दाखल करण्याची अंतिम मुदत उद्या दि. २४ पर्यंतच आहे. आतापर्यंत ३७ जणांनी ५३ अर्ज खरेदी केले आहेत.उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्यामुळे निवडणूक यंत्रणाही सज्ज झाली आहे. उद्याचा दिवस महत्त्वाचा असल्याने जिल्ह्याच्या नजरा या प्रक्रियेकडे लागून राहिल्या आहेत. (वार्ताहर)अपक्षांचे अडथळे...सर्वपक्षीय पाठिंबा मिळूनही बिनविरोधसाठी राष्ट्रवादीने केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत सर्वच पक्षांनी सुमनतार्इंना पाठिंबा दिला असला तरी, उमेदवारीसाठी इच्छुकांनी खरेदी केलेल्या अर्जांची संख्या मोठी आहे. या अपक्ष उमेदवारांच्या अडचणी राष्ट्रवादीसमोर वाढल्या आहेत. पोटनिवडणुकीसाठी सोमवारी आठ जणांनी १२ अर्ज खरेदी केले आहेत, तर आतापर्यंत ३७ जणांनी ५३ उमेदवारी अर्ज नेले आहेत. येत्या २७ मार्च रोजी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे. त्यामुळे उर्वरित तीन दिवसात अपक्षांनाही बिनविरोधसाठी आवाहन करण्याची वेळ राष्ट्रवादी नेत्यांवर येणार आहे.