शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

महिलांकडून सुजित मिणचेकर धारेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 00:12 IST

इचलकरंजी : येथील प्रांत कार्यालयासमोर मराठा समाजाच्यावतीने सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनाला गुरुवारी पाठिंबा देण्यासाठी आलेल्या शिवसेनेचे आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांना ‘पहिल्यांदा आमदारकीचा राजीनामा द्या, मगच पुढे बोला,’ असे म्हणत उपस्थित कार्यकर्त्यांसह महिलांनी धारेवर धरले. जोरदार घोषणाबाजीमुळे वातावरण तणावपूर्ण बनले होते. अखेर आंदोलकांच्या संतप्त भूमिकेमुळे मिणचेकर यांनी ‘आरक्षणासाठी पाठपुरावा करू,’ ...

इचलकरंजी : येथील प्रांत कार्यालयासमोर मराठा समाजाच्यावतीने सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनाला गुरुवारी पाठिंबा देण्यासाठी आलेल्या शिवसेनेचे आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांना ‘पहिल्यांदा आमदारकीचा राजीनामा द्या, मगच पुढे बोला,’ असे म्हणत उपस्थित कार्यकर्त्यांसह महिलांनी धारेवर धरले. जोरदार घोषणाबाजीमुळे वातावरण तणावपूर्ण बनले होते. अखेर आंदोलकांच्या संतप्त भूमिकेमुळे मिणचेकर यांनी ‘आरक्षणासाठी पाठपुरावा करू,’ अशी ग्वाही देत काढता पाय घेतला.आंदोलनस्थळी गेल्यावर आमदार मिणचेकर यांनी आरक्षण मिळण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न व पाठपुरावा याबाबत माहिती देण्यास सुरुवात केली. मात्र, आंदोलकांनी त्यांना ‘सहानुभूती नको, पदाचा राजीनामा देऊन सहभागी व्हा,’ असे म्हणत धारेवर धरले. तर महिला आंदोलकांनी, ‘तुम्ही वैयक्तिक पाठिंबा देण्यासाठी आलात की, पक्षाच्यावतीने पाठिंबा देणार आहात, असे म्हणत राजीनामा द्या,’ अशी मागणी केली. अनेक प्रश्नांचा भडिमार करत जोरदार घोषणाबाजी सुरू केली. त्यामुळे गोंधळ उडाला.अचानकपणे कार्यकर्ते संतप्त बनल्याने तणाव निर्माण झाला. त्यावर डॉ. मिणचेकर हे आरक्षणासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन देत निघून गेले.यावेळी सायली लायकर, सुनीता मोरबाळे, सिंधू शिंदे, उर्मिला गायकवाड, सोनाली आडेकर, संगीता सूर्यवंशी, ज्योती माने, आदींसह समाजातील कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.