शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

कर्जवसुलीच्या तगाद्याने महिलेची आत्महत्या

By admin | Updated: January 6, 2017 00:29 IST

रेंदाळमधील घटना : मुलांच्या शिक्षणासाठी बचतगटाच्या माध्यमातून घेतले होते कर्ज

हुपरी : कुटुंबाचा उदरनिर्वाह व मुलांच्या शैक्षणिक खर्चासाठी बचतगटाच्या माध्यमातून फायनान्स कंपनीकडून घेतलेल्या कर्जाचा सातत्याने सुरू असणारा वसुलीचा तगादा व समाजात होणाऱ्या मानहानीला वैतागून रेंदाळ (ता. हातकणंगले) येथील संगीता शिवाजी काटे (वय ३३, रा. लक्ष्मी नगर) या महिलेने गुरुवारी सायंकाळी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत पोलिसांतून व घटनास्थळावरून समजलेली माहिती अशी, रेंदाळ (ता. हातकणंगले) येथील लक्ष्मीनगर वसाहतीमध्ये संगीता या पती शिवाजी व दोन मुलांसह राहत होत्या. त्यांचे पती शिवाजी हे गवंडी काम करतात. कुटुंबांच्या उदरनिर्वाहाबरोबरच मुलांच्या शैक्षणिक खर्चामुळे घरी पैशांची गरज भासू लागली होती. त्यामुळे त्यांनी कुटुंबाचा चरितार्थ चालविण्यासाठी स्थानिक बचतगटाच्या माध्यमातून एका फायनान्स कंपनीकडून काही कर्जाऊ रक्कम घेतली होती. त्याच्या काही हप्त्यांची परतफेड त्यांनी वेळेत केलेली आहे. चलन बंदीबरोबरच रेंदाळमधील यंत्रमाग व्यवसायही काही कारणाने बंद पडल्याने मध्यंतरी काही दिवस दोघा पती-पत्नींना काम मिळाले नव्हते. परिणामी, पैशांची चणचण मोठ्या प्रमाणात भासू लागल्याने फायनान्स कंपनीकडून घेतलेल्या कर्जाचे हप्ते थकीत जाऊ लागले. बचतगटातील महिला व फायनान्स कंपनीचे वसुली कर्मचारी यांच्याकडून वसुलीसाठी सातत्याने एकसारखा तगादा सुरू झाला होता. कर्जाऊ घेतलेल्या रकमेचे थकीत हप्ते नियमानुसार दंडासह आम्ही भरण्यास तयार आहोत, असे सांगूनही वसुली कर्मचारी दिवस-दिवसभर त्यांच्या घरात थांबत असत. त्यामुळे संगीता यांचे मानसिक संतुलन ढासळत चालले होते. गुरुवारी सायंकाळी बचतगटाच्या महिला परत वसुलीसाठी घरी येणार असल्याचे समजताच त्यांनी सायंकाळी साडेसहा ते सातच्या दरम्यान राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. संगीता यांच्या पश्चात पती शिवाजी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे. या घटनेची तक्रार पती शिवाजी यांनी हुपरी पोलिसांत दिली आहे. (वार्ताहर)फायनान्स कंपन्यांबाबत संतापफायनान्स कंपनीच्या अन्यायी वसुलीच्या तगाद्यामुळे संगीता यांनी केलेल्या आत्महत्येमुळे दोन अल्पवयीन मुले आई विना अनाथ झाली आहेत. यामुळे फायनान्स कंपन्यांच्या वसुलीच्या कार्यपद्धतीबाबत संताप व्यक्त होत येत आहे.