शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
3
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
4
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
5
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
6
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
7
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
8
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
9
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
10
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
11
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
12
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
13
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
14
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
15
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
16
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
17
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
18
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
19
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?

उसाला चांगला भाव मिळेल

By admin | Updated: October 21, 2016 01:49 IST

फरांडेबाबांची भाकणूक : पट्टणकोडोलीत लाखोंच्या उपस्थितीत विठ्ठल बिरदेव यात्रा

इरफान मुजावर -- पट्टणकोडोली (ता. हातकणंगले) येथील प्रसिद्ध श्री विठ्ठल-बिरदेव यात्रेस गुरुवारी लाखो भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. ढोल-ताशांच्या निनादात श्री विठ्ठल-बिरदेवाच्या नावानं चांगभलंच्या गजरात श्री फरांडेबाबांनी ‘हेडाम’ सोहळ्याचे दर्शन घडविले. यावेळी प्रसिद्ध भाकणूकही झाली.खेलोबा वाघमोडे (फरांडेबाबा) महाराज हेडाम खेळत मंदिरात आले. त्यांनी देवाचे दर्शन घेतले. श्री विठ्ठल-बिरदेवाच्या नावानं चांगभलं असा गजर करीत त्यांनी भाकणूक केली. रोहिणीचा पाऊस, मृगाचा पेरा, खळ्याकाठी बैलाच्या खुरी, धारण दोन सव्वा दोन रसभांडे कडक होईल, मिरची, गूळ, हरभरा कडक होईल, रोगराई कानानं ऐकाल, डोळ्यानं पहाल, अहंकार कराल तर सर्वनाश होईल, अशी भाकणूक फरांडेबाबांनी केली.प्रसिद्ध भाकणूक करणारे फरांडेबाबा मंदिरासमोरील दगडी गादीवर विराजमान झाले होते. सकाळपासूनच ढोल वादनाने परिसर दणाणून गेला होता. भंडारा, खारका, खोबरे, लोकर यांच्या उधळणीने वातावरण भक्तिमय बनले होते. मंदिर परिसर सोन्याने ल्याल्यासारखा भासत होता. भाकणुकीसाठी विविध राज्यांतून लाखो भाविक मिळेल त्या वाहनाने पट्टणकोडोलीत दाखल झाले होते. त्यामुळे गावाला जनसागराचे रूप आले होते. दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास मुख्य धार्मिक विधीस प्रारंभ झाला. गावचावडीत गावकामगार पाटील प्रकाश पाटील यांच्या हस्ते मानाच्या तलवारीचे, शस्त्रांचे पूजन झाले. यावेळी मानकरी, गावडे, चौगुले, कुलकर्णी, समस्त पुजारी, धनगर समाज, ग्रामस्थ उपस्थित होते. भानस मंदिरात दर्शन घेतल्यानंतर मुख्य श्री विठ्ठल-बिरदेव मंदिरात सर्वजण आले. तेथे दर्शन घेतल्यानंतर फरांडेबाबांना निमंत्रित करण्यासाठी मानकरी गेले. त्यांच्याबरोबर मानाचा घोडा, छत्र्या, ढोल-कैताळांचा लवाजमा होता. परंपरेनुसार प्रकाश पाटील यांनी फरांडेबाबांना आलिंगन देऊन निमंत्रित केले. यावेळी मोठ्या प्रमाणावर भंडाऱ्याची उधळण सुरू होती.दुपारी अडीच वाजता श्री फरांडेबाबा हातात धारदार तलवार घेऊन उभे राहिले. श्री विठ्ठल-बिरदेवाच्या नावानं चांगभलंचा प्रचंड गजर सुरू होता. ऐतिहासिक ‘हेडाम’ सोहळा पाहण्यासाठी लाखो भाविक स्तब्ध झाले. मानाच्या छत्र्या श्री फरांडेबाबा यांच्यावर फिरविण्यात आल्या. त्यानंतर पोटावर मानाच्या तलवारीचे वार करीत फरांडेबाबा हेडाम खेळत मंदिराची प्रदक्षिणा घालून मंदिरात आले. त्यानंतर भाकणूक झाली. लाखो भाविकांची उपस्थिती असतानाही भाकणूक होताना पूर्णपणे शांतता होती. भाकणूक झाल्यानंतर फरांडेबाबा दर्शन घेऊन मंदिरामागील दगडी गादीवर विराजमान झाले. यात्रेसाठी महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, आदी राज्यांतून लाखो भाविक येथे आले आहेत.भाकणूक सोहळ्यादरम्यान कोल्हापूर, इचलकरंजी, कागल, हुपरी या मार्गांवर वाहतुकीची कोंडी झाली होती. वाहनांचा प्रचंड ताफा या भागात होता. परिवहन विभागाने विविध भागांतून जादा बसेस सोडल्या होत्या, तसेच तात्पुरते बसस्थानकही उभारले होते. वीज मंडळाने अखंडित वीजपुरवठा केला होता. परिसरात मोठ्या प्रमाणावर भंडारा, खारका, नारळ, भांडी, खेळणी, मेवा मिठाई, घोंगडे यांची दुकाने मोठ्या प्रमाणात आली आहेत. यात्रेत लाखो रुपयांची उलाढाल झाली. जागोजागी बाहेरगावच्या भाविकांनी धनगरी ओव्यांचे कार्यक्रम सादर केले. त्यामुळे भागात भक्तिमय वातावरण निर्माण झाले. हुपरी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक शशिकांत सावंत व त्यांच्या सहकाऱ्यांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता.