शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

पस्तीस हजार सभासदांची सवलत साखर बंद होणार

By admin | Updated: December 31, 2016 00:14 IST

बिद्री साखर कारखाना : ऊस पुरवठा होत नसल्याने प्रशासनाकडून हालचाली

सरवडे : बिद्री साखर कारखान्याचे सुमारे ७0 हजार सभासद आहेत. यापैकी सुमारे ३५ हजार सभासदांच्या नावे कारखान्यास ऊसच येत नाही, अशा सभासदांना देण्यात येणारी सवलतीची साखर व अन्य सुविधांसंबंधी कठोर निर्णय घ्यावेत, अशा तक्रारी आल्याने अशा सभासदांबाबत प्रशासन पातळीवर निर्णय घेण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. यासंबंधी प्रशासकीय अध्यक्ष यांनीही दुजोरा दिला.राधानगरी, भुदरगड, कागल व करवीर तालुक्यांतील २१८ गावांचा समावेश या साखर कारखान्यात आहे. त्या त्यावेळी सत्ताधारी संचालक मंडळाने सभासद वाढीचा निर्णय घेतला. सध्या ही सभासद संख्या ७0 हजारांच्या घरात आहे. कारखाना कार्यक्षेत्रात बारमाही पाण्यामुळे मुबलक ऊस उत्पादन आहे, तर पश्चिम महाराष्ट्रात साखर दरात कारखाना अग्रेसर असताना निम्म्याहून अधिक सभासद कारखान्यास ऊस पाठवित नाहीत. तर एका-एका कुटुंबातील चार ते दहा सभासद आहेत. मात्र, एक ते दोन सभासदांच्या नावेच ऊस येताना दिसतो. यावर्षी कार्यक्षेत्रात ११ लाख मे. टन उसाची उपलब्धता आहे. मात्र, शेत मोकळे करून अन्य पीक घेण्यासाठी किंवा तोडणीस थोडा विलंब होत असल्याने शेतकरी अन्य कारखान्यास ऊस पाठवित आहेत.बिद्री साखर कारखाना गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करणार आहे. मात्र, अधिक गाळप झाले, तर उसाला चांगला दर मिळेल. बगॅस वाढला, तर त्याच्यातून वीजनिर्मिती होईल. सभासदांनाच चार पैसे जादा मिळतील, अशी स्थिती असताना सभासद घाईगडबडीत ऊस तोडून अन्य कारखान्यांना पाठवित आहेत.कारखान्यात यापूर्वी राजकीय हेवेदावे असल्याने उसाची उचल वेळेत होत नसे. मात्र, यावर्षी सन २0१६ चा गळीत हंगाम पूर्ण प्रशासक सांभाळत आहे. तरीही कारखान्यास एकूण सभासदांपैकी निम्म्याहून अधिक सभासदांच्या नावावरील ऊस कारखान्यास आलेला नाही. याची नोंद प्रशासकांनी घेतल्याचे वृत्त आहे. अशा सभासदांवर कठोर कारवाई होणार आहे. (वार्ताहर)बिद्री साखर कारखाना मातृसंस्था मानून ३५ हजारांहून अधिक सभासद सातत्याने कारखान्यास ऊस पुरवठा करतात. त्यापैकी काही सभासदांनी तक्रार केल्याने ही तक्रार योग्य असल्याने साखर कारखान्यास ऊस पुरवठा न करणाऱ्या सभासदांना मिळणाऱ्या सवलतीच्या साखरेसंबंधी काही धोरणात्मक निर्णय घेण्याच्या विचारात आहोत.-अरुण काकडे, प्रशासकीय अध्यक्ष, बिद्री साखर कारखाना