शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

सीमाभागात ऊस आंदोलन पेटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2018 00:24 IST

उदगांव : सीमाभागातील साखर कारखान्यांनी मागील ४00 रुपये व चालू हंगामातील उसाचा दर जाहीर न करता कारखाना सुरू केल्याच्या ...

उदगांव : सीमाभागातील साखर कारखान्यांनी मागील ४00 रुपये व चालू हंगामातील उसाचा दर जाहीर न करता कारखाना सुरू केल्याच्या निषेधार्थ कर्नाटक सीमाभागातील ऊस आंदोलन चांगलेच पेटले आहे.अथणी, कागवाड, रायबाग, जमखंडी, मुडलगी, चिकोडीसह तालुक्यातील सर्व शेतकरी संघटना एकत्रित येऊन बेळगाव-विजापूर महामार्गावर सुमारे सहाशेहून अधिक उसाची वाहने गेल्या तीन दिवसांपासून रोखून धरली आहेत. रविवारी मध्यरात्री २७ वाहने पेटवून शासनाचा निषेध केला. त्यामुळे सीमाभागातील गावागावांत आंदोलनाचे पेव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.कर्नाटकातील साखर कारखान्याने गतहंगामात २९०० रुपये दर दिला होता. त्यापैकी २५०० रुपये शेतकऱ्यांना आठ ते नऊ महिन्यांनी दिले व उर्वरित ४०० रुपये अद्याप दिलेले नाहीत. तसेच सध्या होऊ घातलेल्या गळीत हंगामातील एफआरपी जाहीर न करता कारखाने सुरू केले आहेत. मात्र, कोणत्याही शेतकरी संघटनेला विश्वासात न घेता कर्नाटक सरकार व कारखानदारांनी शेतकºयांची मक्तेदारी मोडून काढून कारखाने सुरू केले आहेत. याच्या निषेधार्थ कर्नाटक राज्य रयत संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटना व ऊस उत्पादक संघटना यांच्यावतीने कर्नाटक सीमाभागात गेल्या १५ दिवसांपासून ऊस आंदोलन सुरू आहे.