शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

साखरेची उसळी कायम; द्राक्षांची एंट्री

By admin | Updated: January 11, 2016 01:08 IST

आठवडी बाजार : साखर प्रतिकिलो ३४ रुपये; संत्री, बोरांची आवक वाढली

कोल्हापूर : गेल्या पंधरा-वीस दिवसांत साखरेच्या दराने चांगलीच उसळी घेतली असून, किरकोळ बाजारात ३४ रुपये किलोपर्यंत दर पोहोचले आहेत. थंडी व मार्गशीर्ष महिन्याचा शेवट यामुळे फळ मार्केट थंड असून द्राक्षे, संत्री व बोरांची आवक कमालीची वाढली आहे. फळभाज्यांच्या दरात चढ-उतार असले, तरी पालेभाज्यांच्या दरात गतआठवड्याच्या तुलनेत घट झाली आहे. साखर निर्यातीच्या निर्णयाचा परिणाम बाजारपेठेवर दिसत असून, दिवसेंदिवस साखरेच्या दरात वाढ होत आहे. किरकोळ बाजारात ३४ रुपयांपर्यंत साखरेचा दर झाला आहे. सरकी तेलाबरोबरच हरभरा डाळ, तूरडाळ, मूगडाळ, मूग, मसूरचे दर स्थिर आहेत. तीळ, खोबरे, जिरे, धण्याच्या दरात फारशी चढ-उतार झाली नसून शाबू ५० रुपयांच्या खाली आली आहे. तांबडी मिरचीची मागणी सुरू झाली असून, अजून मागणीत वाढ नसल्याने दर ‘जैसे थे’ आहेत.फळ मार्केटमध्ये सध्या संत्री, बोरांची रेलचेल दिसते. अमरावतीहून संत्र्यांची आवक जोरात असून, घाऊक बाजारात १० ते १४ रुपये किलोचा दर राहिला आहे. गेल्या चार दिवसांत थंडीत थोडी वाढ झाली आहे. त्यातच मार्गशीर्ष महिना संपल्याने फळांच्या मागणीवर परिणाम दिसत आहे. मोसंबी, माल्टा, चिकू, सफरचंद, डाळींब या फळांच्या दरात फारसा चढ-उतार दिसत नाही. बाजार समितीत बोरांची आवक दिवसाला सरासरी पाचशे पोत्यांची आहे. घाऊक बाजारात प्रतिकिलो आठ रुपये दर राहिला आहे. द्राक्षांची रोज साडेआठशे बॉक्सची आवक सुरू झाली असून, सांगली जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात आवक आहे. येत्या आठ दिवसांत आवकेत वाढ होईल, असे व्यापाऱ्यांचे मत आहे. कलिंगडे, अंजीर, केळी, रामफळ, स्ट्रॉबेरीची आवक स्थिर आहे. भाजीपाला मार्केट काहीसे अस्थिर दिसत आहे. प्रमुख भाज्यांच्या दरात चढ-उतार होत आहे. वांगी, टोमॅटो, ढब्बू, फ्लॉवर या भाज्यांच्या दरात घसरण झाली असून भेंडी, वरणाच्या दरात वाढ झाली आहे. घाऊक बाजारात वांगी २७ रुपये, टोमॅटो १५ रुपये, ढब्बू २८ रुपये दर आहे. उर्वरित भाज्यांचे दर स्थिर आहेत. कोथिंबीरचे दरही तेजीत असून, आठ रुपये पेंडी आहे.गुळाची पुन्हा घसरण!गुळाची आवक वाढू लागली तरी दरात पुन्हा घसरण होऊ लागली आहे. पाच, दहा व तीस किलो गूळरव्यांच्या दरात प्रतिक्विंटल १५० ते एक किलो बॉक्सच्या दरात प्रतिक्विंटल दोनशे रुपये दर खाली आला आहे.लसणाचा दिलासागेले पंधरा ते वीस दिवस लसणाने दीडशे रुपयांचा टप्पा पार केला होता. या आठवड्यात घाऊक बाजारात तो प्रतिकिलो १३० रुपयांपर्यंत खाली आला आहे. विशेष म्हणजे लसणाची आवक कमी असूनही दरात घसरण झाली असून, बटाट्याचे दर मात्र स्थिर आहेत. कांद्याच्या दर तुलनेने थोडे कमी झाले आहेत.