शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

साखर उत्पादन ३० लाख टनांनी घटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 19:17 IST

राजाराम लोंढे । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : साऱ्या महाराष्टÑाला दुष्काळाचे चटके बसू लागल्याने त्याचा परिणाम जनजीवनावर झाला आहे. ...

राजाराम लोंढे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : साऱ्या महाराष्टÑाला दुष्काळाचे चटके बसू लागल्याने त्याचा परिणाम जनजीवनावर झाला आहे. उभी पिके करपू लागल्याने उत्पादन घटणार असून, पाणीटंचाईचा सर्वाधिक फटका ऊस उत्पादनावर होणार आहे. गत हंगामाच्या तुलनेत २०१९-२० मध्ये राज्याचे साखर उत्पादन किमान ३० लाख टनांनी घटेल, असा अंदाज आहे. त्या तुलनेत देशाच्या उत्पादनावर परिणाम कमी दिसत असला, तरी ९ टक्के उत्पादन घटेल, असा अंदाज ‘इस्मा’ने वर्तवला आहे.गेल्या दोन वर्षांपासून महाराष्टÑासह देशात उसाच्या उत्पादनात मोठी वाढ झाली आहे. यामध्ये महाराष्टÑाचा वाटा सर्वाधिक असून, त्याचा परिणाम साखरेच्या दरावर झाला. हंगाम २०१८-१९ मध्ये तर उसाचे बंपर पीक होऊन ९५१ लाख टन उसाचे गाळप होऊन १०७ लाख टन साखरेचे उत्पादन झाले. मागील हंगामातील शिल्लक साखर आणि या हंगामातील साखर उत्पादनामुळे कारखान्यांना अग्निदिव्यातूनच पुढे जावे लागले. त्यात वाढलेली एफआरपीची रक्कम आणि साखरेच्या मागणीत झालेल्या घटीमुळे साखर ठेवण्यासाठी कारखान्यांना गोडावून कमी पडू लागली आहेत. साखर पडून राहिल्याने त्यावरील बॅँकेच्या कर्ज व्याजाचा बोझा वाढत चालल्याने कारखानदारांची चिंता वाढली आहे. मागील हंगामाएवढीच यंदाही उसाची लागवड झाल्याने आगामी हंगामातही तेवढेच साखर उत्पादन झाले, तर साखर उद्योग आर्थिक अरिष्टात सापडणार हे निश्चित आहे; पण यंदा सारा महाराष्टÑ दुष्काळात होरपळत आहे. पिण्यासह जनावरांनाही पाणी नाही, तिथे पिकांचा विषयच नाही. मराठवाडा, पश्चिम महाराष्टÑातील सातारा, सोलापूर, सांगलीतील काही तालुके, खानदेश व विदर्भातील काही जिल्ह्यांत दुष्काळाच्या झळा मोठ्या प्रमाणात बसल्या आहेत. पुणे, सोलापूर, कोल्हापूर या विभागातच मोठ्या प्रमाणात उसाचे उत्पादन घेतले जाते; पण कोल्हापूर व सातारा जिल्ह्यांतील काही तालुके वगळता उर्वरित ठिकाणी दुष्काळाचा चटका ऊस पिकाला बसला आहे. त्याचा थेट परिणाम ऊस उत्पादनावर होईल, असा अंदाज साखर आयुक्त कार्यालयाचा आहे. मागील दोन वर्षांच्या उसाच्या उत्पादनात किमान २० टक्के घट होऊन साखर उत्पादन ८५ लाख टनापर्यंत खाली येईल, असा अंदाज आहे. महाराष्टÑाबरोबरच देशाच्या ऊस उत्पादनातही ९ टक्के घट होईल, असा अंदाज ‘इस्मा’ने वर्तवला आहे. संपलेल्या गळीत हंगामात देशात ३३० लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते, त्यात घट होऊन ३०३ लाख टनापर्यंत येईल, असा अंदाज आहे.राज्याचे साखर उत्पादन लाख टनातहंगाम साखरेचेउत्पादन२००८-०९ ४६२००९-१० ७१२०१०-११ ९१२०११-१२ ९०२०१२-१३ ८०२०१३-१४ ७७२०१४-१५ १०५२०१५-१६ ८४२०१६-१७ ४२२०१७-१८ १०७२०१८-१९ १०७२०१९-२० ८५