शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

साखरेचे उत्पादन २८९ लाख टनच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 23:08 IST

चंद्रकांत कित्तुरे। लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : देशभरात गळीत हंगाम गती घेत असतानाच या हंगामातील साखर उत्पादनाचे अंदाज मात्र ...

चंद्रकांत कित्तुरे।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : देशभरात गळीत हंगाम गती घेत असतानाच या हंगामातील साखर उत्पादनाचे अंदाज मात्र बदलत आहेत. नव्या अंदाजानुसार २०१८-१९ च्या साखर हंगामात २८९ लाख टन साखरेचे उत्पादन होण्याची शक्यता आहे. सुरुवातीला हा अंदाज ३५५ लाख टनांचा होता. दुष्काळी परिस्थिती आणि ऊसावरील हुमणी किडीचा प्रादुर्भाव ही यामागची मुख्य कारणे आहेत.गेल्या हंगामात तब्बल ३२० लाख टन साखरेचे उत्पादन झाले. मागणीपेक्षा ते सुमारे ६० टनांनी जादा होते. अतिरिक्त उत्पादनामुळे साखरेचे दर ३५०० रुपयांवरून २५०० रपये प्रतिक्विंटलपर्यंत खाली आले. परिणामी, साखर उद्योगच अडचणीत आला. हे दर वाढावेत यासाठी सरकारने साखरेचा किमान विक्रीदर २९ रुपये निश्चित करून दिला. निर्यातीला प्रोत्साहन देण्यासहविविध उपाययोजना केल्या तरी साखरेचे देशांतर्गत घाऊक बाजारातील दर जीएसटी वगळता ३००० रुपयांच्या आतबाहेरच घुटमळत राहिले आहेत.ऊस लागवडीखालील क्षेत्रात झालेली वाढ आणि चांगले हवामान यामुळे २0१८-१९ च्या हंगामात ३५५ लाख टन साखरेचे उत्पादन होईल, असा अंदाज ‘इस्मा’ या संघटनेने सुरुवातीला वर्तविला होता. मात्र, नंतर परिस्थिती बदलली. देशाच्या काही भागात पावसाने दडी मारली. दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली. त्याचप्रमाणे उसावर हुमणी किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला. परिणामी, ‘इस्मा’नेच गेल्या महिन्यात आपला अंदाज ३२० लाख टनांवर आणला आहे.तरीही साखर अतिरिक्तचया हंगामाच्या सुरुवातीला सुमारे १०७ लाख टन साखर शिल्लक आहे. ती आणि नव्या हंगामातील २८९ लाख टन अशी ३९६ लाख टन साखर देशात उपलब्ध होणार आहे. देशाची गरज २६० लाख टनांची आहे. अतिरिक्त साखर कमी करण्यासाठी म्हणून केंद्र सरकारने यंदा ५० लाख टन साखर निर्यातीचे लक्ष्य कारखान्यांना दिले आहे.साखरेचे विक्री दर वाढणार का?असे असले तरी साखर कारखानदारी मात्र अस्वस्थ आहे. साखरेचा उत्पादन खर्च सुमारे ३५०० रुपये प्रतिक्विंटल असल्याने सद्य:स्थितीत एफआरपीही एकरकमी देणे अवघड असल्याने सरकारने साखरेचा किमान विक्रीदर ३५०० रुपये प्रतिक्विंटल निश्चित करावा, अशी या कारखानदारांची मागणी आहे. सरकार तो वाढवून देणार का, की निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आहे तोच दर कायम ठेवणार, याबाबत उत्सुकता आहे.