शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
ट्रम्प यांनी दंड थोपटले! अमेरिकेच्या तीन युद्ध नौका व्हेनेझुएलाच्या दिशेने रवाना; ४००० सैन्यही सज्ज
3
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
4
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
5
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
6
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
7
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
8
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
9
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
10
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
11
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
12
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
13
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
14
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
15
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
16
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
17
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
18
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
19
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
20
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा

साखरेच्या दरात ९०० रुपयांनी वाढ

By admin | Updated: October 20, 2015 21:04 IST

कारखानदारांपेक्षा व्यापाऱ्यांकडे जास्त साठा : दसरा, दिवाळीमुळे दरवाढ झाल्याचे तज्ज्ञांचे मत

प्रकाश पाटील-- कोपार्डे -आॅगस्टमध्ये १९०० रुपयांपर्यंत घसरलेल्या साखरेच्या दरातील घसरण थांबली असून, केवळ दोन महिन्यांत प्रतिक्विंटल ८०० ते ९०० रुपये वाढ झाली आहे. सध्या साखरेचे दर एक्स फॅक्टरी २८०० रुपये प्रतिक्ंिवटल पोहोचले असून, दसरा, दिवाळीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर ही दरवाढ झाल्याची शक्यता असल्याचे मत साखर उद्योगातील तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे. हंगाम २०१४-१५च्या सुरुवातीला साखरेचे दर ३१०० ते ३२०० रुपये प्रतिक्ंिवटल असतानाही कारखानादारांनी एफ.आर.पी.प्रमाणे दर देण्यास चालढकल केली होती; पण शासनानेच एफ.आर.पी. न देणाऱ्या कारखान्यांवर कारवाईचा बडगा उचलताच कारखानदारांनी एफआरपी जाहीर करण्यास सुरुवात केली. मात्र, हा ३१०० रुपये प्रतिक्विंटल दर उत्पादन खर्चाचा मेळ घालण्याइतपत होता. त्यामुळे कारखानदारांनी एफआरपीचे धाडस केले. मात्र, यानंतर साखर दराची घसरण सुरू झाली. ती आॅगस्ट २०१५ पर्यंत सुरू राहिली. आॅगस्ट २०१५ मध्ये साखरेचे दर १९०० रुपयांवर आल्यानंतर साखर कारखानदारांचे धाबे दणाणले. कोल्हापूर विभागातील ३४ साखर कारखान्यांकडे हंगाम २०१४-१५च्या शेवटच्या टप्प्यांतील ८५० कोटी रुपये थकले होते. केंद्र शासनाने बिनव्याजी कर्जाची मदत केल्यानंतरच शेतकऱ्यांची देणी देता आली. साखर उद्योगापुढील अडचणींचा पाढा माजी कृषिमंत्री शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापुढे वाचल्यामुळेच बिनव्याजी कर्जाच्या पॅकेजबरोबर ४० लाख टन साखर निर्यात व साखरेचा बफर स्टॉक करण्याचे सूतोवाच करताच आॅगस्ट २०१५पासून साखर दराच्या घसरणीला ब्रेक लागला आहे. १९०० रुपये प्रतिक्विंटल घसरलेले दर वाढायला सुरुवात झाली आहे. दरवाढीने दिलासाकेवळ दोन महिन्यांत साखरेच्या दरात प्रतिक्विंटल ७०० ते ८०० रुपये वाढ झाली आहे. यात आणखी वाढ होण्याची शक्यता साखर उद्योगातून व्यक्त करण्यात येत आहे. दसरा, दिवाळीच्या सणादरम्यान साखरेचे दर ३१०० ते ३५०० च्या दरम्यान जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यामुळेच एफ.आर.पी.वरून हंगाम २०१५-१६ च्या सुरुवातीला संघटना, कारखानदार व शासन असा त्रिकोणी संघर्ष निर्माण झाला असता. मात्र, साखरेच्या दरवाढीने साखर उद्योगाला दिलासा मिळाला आहे.हंगाम २०१४-१५ मध्ये साखरेच्या दरातील घसरणीचा आलेख (प्रतिक्ंिवटल रुपयांत)आॅक्टोबर२०१४ - ३१०० ते ३२०० डिसेंबर२०१४ - २८०० ते २८५० जानेवारी२०१५ - २७५०फेबु्रवारी२०१५ - २६५०मार्च२०१५ - २५००एप्रिल२०१५ - २४००मे२०१५ - २३००जून२०१५ - २२५०जुलै२०१५ - २१००आॅगस्ट२०१५ - १९०५सप्टेंबर२०१५ - २३००आॅक्टोबर२०१५ - २७०० ते २८००