शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

साखर सहसंचालकांना हाकलल

By admin | Updated: January 31, 2015 00:01 IST

सेना आक्रमक : ‘एफआरपी’प्रमाणे पैसे देण्याची मागणी; टेबल, टेलिफोनची आदळआपटे

कोल्हापूर : साखर कारखान्यांचे हंगाम संपत आले, तरी गाळप झालेल्या  ७५ टक्के उसाचे पैसे शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत. शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्याची वाट पाहत आहात काय ? अशी विचारणा करीत, ‘केवळ आश्वासन नको, प्रत्यक्ष फौजदारी दाखल करा; अन्यथा कार्यालयात बसू देणार नाही,’ असा इशारा देत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी कोल्हापूरचे साखर सहसंचालक वाय. व्ही. सुर्वे यांना खुर्चीवरून अक्षरश: हाकलून लावले. ‘एफआरपी’प्रमाणे कारवाई न करणाऱ्या कारखान्यांवर फौजदारी दाखल करावी, या मागणीसाठी आज, शुक्रवारी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्या नेतृत्वाखालील कार्यकर्त्यांनी साखर सहसंचालक कार्यालयावर मोर्चा काढला. शेतकरी देशोधडीला लागलेला आहे. उसाचे पैसे मिळाले नसल्याने कर्जाचे हप्ते थकले आहेत. शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्याची वाट पाहता का ? असा संतप्त सवाल संजय पवार यांनी केला. आयुक्तांच्या नोटिसांचे काही सांगू नका. तुम्ही पोस्टमनचे काम करणार असाल, तर तुमच्यासह या खुर्चीची कोल्हापूरच्या शेतकऱ्यांना गरज नसल्याचे संजय पवार, मुरलीधर जाधव व विजय देवणे यांनी सांगितले. ‘वारणा’ कारखान्याने एफ. आर. पी.पेक्षा चारशे रुपये कमी देऊनही कारवाई का केली नाही, अशी विचारणा आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांनी केली. पहिल्यांदा गुन्हा दाखल करा, मग ‘आरआरसी’ची कारवाई करा, अशी मागणी आमदार उल्हास पाटील यांनी केली. आपणाला ते अधिकार नसल्याचे सुर्वे यांनी सांगितल्यानंतर संतप्त कार्यकर्त्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. तुम्हाला अधिकार नाहीत तर खुर्ची खाली करा, अशी मागणी करीत संजय पवार, विजय देवणे, मुरलीधर जाधव आक्रमक झाले. ‘येथून बाजूला व्हा. जोपर्यंत कारवाई करीत नाही तोपर्यंत खुर्चीवर बसाल तर याद राखा’, असा दमही त्यांनी सुर्वे यांना दिला. पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केला; पण कार्यकर्ते ऐकत नसल्याचे पाहून सुर्वे यांना पोलीस बंदोबस्तात बाहेर नेण्यात आले. तोपर्यंत कार्यकर्त्यांनी खुर्चीला हात घालण्याचा प्रयत्न केला; पण पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न केल्याने संतप्त कार्यकर्त्यांनी टेबल व टेलिफोनची आदळापट सुरू केली. सुजित चव्हाण, बाजीराव पाटील, मधुकर पाटील, तानाजी आंग्रे, संभाजी भोकरे, हर्षल सुर्वे, संदीप पाटील उपस्थित होते. सोमवारपासून प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात : शर्माचौदा दिवसांत शेतकऱ्यांना पैसे दिले नाहीत म्हणून कारखान्यावर थेट फौजदारी दाखल करता येत नाही. यासाठी संबंधित कारखान्यांची ‘आरआरसी’ अनुसार साखर जप्त करून त्यातून शेतकऱ्यांचे पैसे देता येतात; पण त्यातून शेतकऱ्यांचे पैसे मिळाले नाहीत, तर कारखान्यांच्या संचालकांवर फौजदारी दाखल करता येते. त्याप्रमाणे आढावा घेण्याचे काम सुरू असून, येत्या सोमवारपासून साखरजप्तीची कारवाई करणार असल्याची माहिती साखर आयुक्त विपीन शर्मा यांनी दिली. यांना काढल्या नोटिसापंचगंगा, शरद, डी. वाय. पाटील, महाडिक शुगर्स, वारणा, कुंभी-कासारी, भोगावती, राजाराम कारखानागेले दोन महिन्यांत साखर आयुक्तांकडे कारखान्यांवरील कारवाईबाबत तीन प्रस्ताव पाठविले आहेत. संबंधितांकडून कारवाईचे आदेश येत नाहीत तर मी काय करू? शेतकऱ्यांच्या भावना मी समजू शकतो; पण जो अधिकारच मला नाही, तो वापरणार कसा ?- वाय. व्ही. सुर्वे, प्रादेशिक साखर सहसंचालक