शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

साखर उद्योगाला ‘अच्छे दिन’!

By admin | Updated: March 26, 2016 00:49 IST

दर प्रतिक्ंिवटल ३४०० रुपये : ‘एफआरपी’ देणे शक्य होणार

चंद्रकांत कित्तुरे --कोल्हापूर -साखरेचे दर प्रतिक्विंटल ३४०० रुपयांपर्यंत गेल्याने साखर उद्योगाला ‘अच्छे दिन ’ येण्याची चिन्हे दिसत आहेत. शुक्रवारी एका दिवसात साखरेच्या दरात प्रतिक्विंटल ५० ते ६० रुपयांची वाढ होऊन तो ३३५० ते ३४०० रुपये ( एक्स फॅक्टरी दर ३१५० ते ३२०० रुपये) झाला आहे. यामुळे कारखान्यांना उसाची एफआरपी देणे शक्य होणार आहे. बाजाराची कमान अशीच चढती राहिल्यास साखर कारखान्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासही मदत होणार आहे.आंतरराष्ट्रीय बाजारातील वाढलेले दर, त्यामुळे होत असलेली साखरेची निर्यात, दुष्काळामुळे गतवर्षीच्या तुलनेत घटलेले साखर उत्पादन आणि लग्नसराई आणि उन्हाळ्यामुळे वाढलेली साखरेची मागणी यामुळे बाजारातील साखरेचे दर वाढत आहेत. तसे दरवर्षीच मार्च, एप्रिल आणि मे या तीन महिन्यांत साखरेच्या दरात तेजी येत असते. यंदा थोडे उशिराच दर वाढू लागले आहेत. व्यापाऱ्यांकडील साखरेचा शिल्लक साठा आणि बाजाराचा कल पाहण्याची व्यापाऱ्यांची भूमिका यामुळे ही दरवाढ थोडी उशिरा सुरू झाल्याचे साखर कारखानदारीतील तज्ज्ञांचे मत आहे. या दरवाढीमुळे साखर कारखान्यांना चांगला दर मिळत असला तरी त्यामुळे लगेच त्यांची आर्थिक स्थिती सुधारेल किंवा उसाला आणखी चांगला दर देणे शक्य होईल, असे नाही. कारण गेली दोन वर्षे बाजारात उत्पादन खर्चाइतकाही साखरेला दर नसतानाही तोटा सहन करून उसाला एफआरपीप्रमाणे कारखान्यांनी दर दिला आहे. यासाठी केंद्र सरकारकडून बिनव्याजी कर्ज घेतले आहे. त्याचा प्रतिटन बोजा साधारणपणे ६०० रुपये इतका आहे. हे कर्ज पाच वर्षांत फेडायचे आहे. यातले पहिले वर्ष गेले असे म्हटले तरी पुढील चार वर्षांत हे कर्ज फेडण्यासाठी प्रतिटन १२५ ते १५० रुपये कारखान्यांना बाजूला काढून ठेवावे लागणार आहेत.वायदे बाजारातही साखरेच्या दरात शुक्रवारी ७५ रुपयांची वाढ झाली. एप्रिल महिन्यासाठी गुरुवारी एस ३० ग्रेडच्या साखरेचा दर कर वगळता प्रतिक्विंटल ३०७५ ते ३१२५ रुपये असा होता. तो एप्रिलच्या पहिल्या आठवड्यासाठी शुक्रवारी ३१३० ते ३१८० रुपये (यात २०० रुपये कराचे जमा केल्यास हा दर ३३३० ते ३३८० रुपये होतो) प्रतिक्विंटल इतका झाला आहे. गेल्या वर्षी देशांतर्गत साखरेचे उत्पादन २८ लाख टनांपर्यंत गेले होते. यंदा ते २५५ ते २६० लाख टनांपर्यंत राहील, असा अंदाज आहे. दुष्काळामुळे पुढील वर्षी उसाचे क्षेत्र कमी होणार असल्याने साखर उत्पादनात आणखी घट होण्याची शक्यता आहे. यामुळे साखरेच्या दरात वाढ होऊ लागली असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.अतिरिक्त साखर उत्पादनामुळे गेल्या दोन वर्षांत बाजारात मागणीपेक्षा साखरेचा पुरवठा जादा होता; मात्र सध्या साखरेची होणारी निर्यात आणि घटलेल्या उत्पादनामुळे मागणी पुरवठ्याचे संतुलन साधले गेल्याने बाजारातील साखरेचे दर वाढत आहेत. यामुळे कारखान्यांना एफआरपीप्रमाणे उसाची बिले भागविता येणे शक्य होणार आहे; मात्र गेल्या दोन वर्षांत एफआरपीसाठी घेतलेले बिनव्याजी कर्ज फेडण्याची जबाबदारीही कारखान्यांना पेलावी लागणार आहे .- विजय औताडे, कार्यकारी संचालक, छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना, कागल.