शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रामुळे ऊस उत्पादकांचे वर्षाला १६०० कोटींचे नुकसान:राजू शेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2018 23:45 IST

इचलकरंजी (जि.कोल्हापूर) : केंद्र सरकारने बेकायदेशीररीत्या एफआरपीचा (निर्धारित हमीभाव) बेस अर्ध्या टक्क्याने वाढवून राज्यातील शेतकऱ्यांचे वर्षाला १६०० कोटींचे नुकसान ...

इचलकरंजी (जि.कोल्हापूर) : केंद्र सरकारने बेकायदेशीररीत्या एफआरपीचा (निर्धारित हमीभाव) बेस अर्ध्या टक्क्याने वाढवून राज्यातील शेतकऱ्यांचे वर्षाला १६०० कोटींचे नुकसान केले आहे. याविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करून कायद्याने अद्दल घडविणार असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, खासदार राजू शेट्टी यांनी दिला.इचलकरंजी येथे शनिवारी रात्री भाजप सरकारच्या कारभाराचा पंचनामा या विषयावर आयोजित सभेत ते बोलत होते. शेट्टी म्हणाले, एफआरपीमध्ये २०० रुपयांची वाढ केल्याने राजू शेट्टी यांना आता काही काम राहिले नाही अशी टीका दोन्ही सरकारमधील भाजप नेते करत आहेत. मात्र, २०० रुपयांची वाढ, अशी फसवी घोषणा केली. सरकारने प्रत्यक्षात २०० रुपयांची वाढ दिल्याचे सांगत असले तरी रिकव्हरीचा ९.५ टक्के असलेला बेस दहा टक्के केला आहे. त्यामुळे शेतकºयांना फक्त १३.५० रुपयांचीच वाढ मिळणार आहे. त्यातही उत्पादन खर्च वाढल्याने चौदा रुपयांचे नुकसान होणार आहे. त्यामुळे शेतकरी ५० पैसे नुकसानीतच राहणार आहे.वस्त्रोद्योगासाठी लढा उभारणारशेट्टी म्हणाले, भाजप सरकारने वस्त्रोद्योगाची परिस्थिती बिकट बनविली आहे. वीज दर कमी केले म्हणून तीनवेळा भाजप नेत्यांनी साखर वाटली. ही साखर वाटून लोकांची साखर वाढली. मात्र, वीज दर कमी झाले नाहीत. वस्त्रोद्योगमंत्र्यांनी अनेक घोषणा केल्या, त्याही आजतागायत पूर्ण केल्या नाहीत. त्यामुळे भविष्यात यंत्रमागधारकांना सोबत घेऊन याविरोधात मोठा लढा उभारणार असल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली.चंद्रकांत पाटील यांनीच माझ्याविरुद्ध लढावेराजू शेट्टी म्हणाले, हातकणंगले लोकसभा मतदारसंघात प्रत्येक वेळी माझ्याविरोधात नव्या उमेदवारांची नावे घोषित करीत बसण्यापेक्षा कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनीच माझ्या विरोधात निवडणूक लढवावी. माझे त्यांना जाहीर आव्हान आहे.