शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

सांगलीत ३ मे रोजी प्रति साखर परिषद

By admin | Updated: April 27, 2015 00:17 IST

सदाभाऊ खोत : सरकारविरोधी ‘स्वाभिमानी’चा एल्गार

सांगली : शेतकरी हिताची आश्वासने देऊन सत्तेवर आलेल्या सरकारकडून अपेक्षाभंग झाला आहे. तुम्ही शेतकऱ्यांवर गाढवाचा नांगर फिरवणार असाल, तर जनता तुम्हाला गाडल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, हे सत्ताधाऱ्यांनी लक्षात ठेवावे. सहा महिन्यांतील सरकारचा कारभार लक्षात घेता सरकारविरोधात मैदानात उतरणार असल्याचा इशारा संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी रविवारी पत्रकार बैठकीत दिला. लढ्याचाच एक भाग म्हणून ३ मे रोजी सांगलीत प्रति साखर परिषदेचे आयोजन केल्याचेही त्यांनी सांगितले. ते म्हणाले, कॉँग्रेस, राष्ट्रवादीच्या भ्रष्ट कारभाराला विरोध म्हणून शेतकरी संघटना भाजप सरकारच्या बाजूने उभी राहिली होती. सरकारने शेतकरी हिताचे निर्णय घ्यावेत, यासाठी त्यांना सूचना करूनही त्यांच्यात सुधारणा झालेली दिसत नाही. एफआरपीचा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या हातात पडेल, अशी साधी अपेक्षा होती; परंतु सहकारमंत्र्यांच्या वल्गना सोडल्यास दमडीही शेतकऱ्यांना मिळालेली नाही. सरकारने केवळ लिकर लॉबीचे हित जपण्याचेच कार्य केले आहे. मध्यंतरी पुणे येथे भाजप आणि राष्ट्रवादीने साखर परिषदेचे आयोजन केले होते. ज्यांनी शेतकऱ्यांच्या घरावर दरोडे घातले, त्यांना घेऊनच साखर परिषद घेण्यात आली. सरकारला सामान्य शेतकऱ्यांनी निवडून दिले होते, मग त्यांना बाजूला सारून कारखानदारांना परिषदेत का बोलाविले हे समजत नाही. अडतबाबत नेमलेली समितीही वाऱ्यावरची वरातच ठरणार असून, त्यातून काहीही निष्पन्न होणार नाही. दूध दराबाबतही फारसे आशादायक चित्र नाही. या सर्व प्रश्नांवर आवाज उठविण्यासाठीच तीन मे रोजी सांगलीत राजपूत कार्यालयात दुपारी एक वाजता प्रति साखर परिषदेचे आयोजन केले आहे. (प्रतिनिधी) पुुण्यात झालेल्या साखर परिषदेत सहकारमंत्री पाटील यांनी खासदार शरद पवार यांना गुरूची उपमा दिली आहे. हे त्यांनी निवडणुकीपूर्वी जनतेला सांगितले असते, तर मतदारांनी मत देताना नक्कीच विचार केला असता, असे खोत यांनी सांगितले.पवारांचे ‘रनर’ व्हावेशरद पवार अप्रत्यक्षरीत्या सरकारमध्येच असल्याने भाजप सरकारने त्यांनाच कृषिमंत्री करून सहकारमंत्री पाटील यांनी क्रिकेटमध्ये रनर असतो, तसे पवारांचे ‘रनर’ म्हणून काम करावे, असा टोलाही खोत यांनी लगावला.