शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

साखर सहसंचालकांना शिवसेनेचा घेराव

By admin | Updated: January 30, 2015 23:14 IST

आयुक्तांकडे कारवाईबाबत पत्रव्यवहार केला असल्याचे सुर्वे यांनी सागिंतले; पण आयुक्तांच्या नोटिसांचे काही सांगू नका.

कोल्हापूर : ऊसाच्या एफआरपीच्या मुद्द्यावरून शिवसेनेचे शुक्रवारी साखर सहसंचालकांना घेराव घालत दोषी कारखान्यांवर फौजदारी कारवाई करेपर्यंत कार्यालयात बसू देणार नसल्याचा इशारा दिला. साखर कारखान्यांचे हंगाम संपत आले तरी गाळप झालेल्या ७५ टक्के उसाचे पैसे शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत. शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्याची वाट पाहत आहात काय, असा सवाल शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी साखर सहसंचालक वाय. व्ही. सुर्वे यांना केला आणि खुर्चीवरून त्यांना अक्षरश: हाकलून लावले. शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्या नेतृत्वाखालील कार्यकर्त्यांनी साखर सहसंचालक कार्यालयावर मोर्चा काढला होता.आयुक्तांकडे कारवाईबाबत पत्रव्यवहार केला असल्याचे सुर्वे यांनी सागिंतले; पण आयुक्तांच्या नोटिसांचे काही सांगू नका. तुम्ही पोस्टमनचे काम करणार असाल तर तुमच्यासह या खुर्चीची कोल्हापूरच्या शेतकऱ्यांना गरज नसल्याचे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. मला ते अधिकार नसल्याचे सुर्वे यांनी सांगितल्यानंतर संतप्त कार्यकर्त्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला; पण ते ऐकत नसल्याचे पाहून सुर्वे यांना पोलीस बंदोबस्तात बाहेर नेण्यात आले. संतप्त कार्यकर्त्यांनी टेबल व टेलिफोनची आदळआपट केली. अखेर संजय पवार यांनी त्यांना शांत केले. सोमवारपासून साखरजप्तीचौदा दिवसांत शेतकऱ्यांना पैसे देणे बंधनकारक आहे; पण त्याची अंमलबजावणी न करणाऱ्यांवर थेट फौजदारी दाखल करता येत नाही. कारखान्यांची ‘आरआरसी’ अनुसार साखर जप्त करून त्यातून शेतकऱ्यांचे पैसे देता येतात; त्यातून पूर्ण पैसे मिळाले नाहीत तर संचालकांवर फौजदारी दाखल करता येते, असे कायदा सांगतो. त्याप्रमाणे आढावा घेण्याचे काम सुरू असून, नोव्हेंबरअखेर कोणी किती पेमेंट केले आहे, साखर साठा किती आहे, याची माहिती घेतली असल्याचे साखर आयुक्त विपीन शर्मा यांनी सांगितले.(प्रतिनिधी)