शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

साखर सहसंचालकांच्या दारात शेतकरी संघटनेतर्फे काळी गुढी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2016 00:51 IST

आता साखरेचे दर ३६०० रुपयांपर्यंत जाऊनही उर्वरित २० टक्के रक्कम देण्याचे नाव साखर कारखानदार काढत नाहीत.

कोल्हापूर : यंदाचा गळीत हंगाम संपत आला तरी एफआरपीमधील उर्वरित २० टक्के रक्कम कारखान्यांनी दिलेली नाही. मुख्यमंत्र्यांनी दिलेले आश्वासन पाळले नसल्याबद्दल शुक्रवारी शेतकरी संघटनेच्या वतीने प्रादेशिक साखर सहसंचालकांच्या दारात काळी गुढी उभा करून निषेध नोंदविला. ऊसदरावरून पेच निर्माण झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व खासदार राजू शेट्टी यांनी तडजोड करत ८०:२० चा फॉर्म्युला आणला. आता साखरेचे दर ३६०० रुपयांपर्यंत जाऊनही उर्वरित २० टक्के रक्कम देण्याचे नाव साखर कारखानदार काढत नाहीत. शेतकऱ्यांचा खरीप हंगाम जवळ आला असताना त्याला उसाचे पैसे मिळत नसल्याने अडचण निर्माण झाली आहे. एकीकडे दुष्काळ व दुसरीकडे कारखानदार उसाचे पैसे देत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. मात्र, सहकारमंत्री काहीच बोलत नाहीत. ज्यांनी तडजोड केली तेही मूग गिळून गप्प आहेत. याचा निषेध करण्यासाठी गुढीपाडव्यादिवशी प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाच्या दारात काळी गुढी उभी केल्याचे युवा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. माणिक शिंदे यांनी सांगितले. या गुढीला साखरेच्या माळेऐवजी कारखान्यांनी एफआरपीबाबत दिलेल्या हमीपत्रांची माळ केली असून आठ दिवसांत एफआरपीमधील २० टक्के दिले नाही तर उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा अ‍ॅड. शिंदे यांनी दिला. यावेळी अजित पाटील, महादेव कोल्हे, आदम मुजावर, टी. आर. पाटील, दिलीप माणगावे, मोहन चौगुले, विष्णू सणगर, किसन पाटील, गुणाजी शेलार, बदाम शेलार यांच्यासह शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)गुढी सायंकाळनंतरही उभीच !सकाळी बांधलेली गुढी सायंकाळी उतरली जाते, पण सहसंचालक कार्यालयाबाहेर बांधलेली गुढी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी उतरलेली नाही. कार्यालयाला तीन दिवस सुटी असल्याने सोमवारी अधिकाऱ्यांनीच गुढी उतरावी, असा आग्रह कार्यकर्त्यांचा आहे.