शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

भाजपकडून विकास निधीत सुडाचे राजकारण

By admin | Updated: September 9, 2015 00:25 IST

महापालिका पदाधिकाऱ्यांचा आरोप : सभागृहाला अधांतरी ठेवून निर्णय

कोल्हापूर : गेल्या पाच वर्षांत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व जनसुराज्य पक्षाची सत्ता असताना कोल्हापूर शहराच्या विकासासाठी ११३१ कोटी रुपयांचा निधी राज्य व केंद्र सरकारकडून आणला; पण त्याचे राजकारण कधी केले नाही; परंतु गेल्या आठ-दहा महिन्यांत भाजपने २० कोटींचा निधी आणला. मात्र, त्याद्वारे सुडाचे राजकारण केले जात आहे, असा आरोप महापौर वैशाली डकरे यांच्यासह महापालिकेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी केला. विकासकामांसाठी आणलेल्या २० कोटींच्या निधीला आमचा विरोध नाही, तर सभागृहाला अधांतरी ठेवून आणि विश्वासात न घेता ज्या पद्धतीने विकासकामांचे नियोजन केले जात आहे त्याला आमचा विरोध आहे, असे राजेश लाटकर यांनी सांगितले. महत्त्वाचे म्हणजे सन २००८ मध्ये जो शासननिर्णय झाला आहे, त्यालाही भाजपने हारताळ फासला आहे. जिल्हास्तरीय समितीने राज्य सरकारच्या विकास निधीचे नियोजन करायचे असते. त्यासाठी मनपाचे ‘नाहरकत प्रमाणपत्र’ असावे, अशी अट आहे; परंतु सर्व नियम बाजूला ठेऊन कुणीतरी तिसरेच नियोजन करत आहेत, असे लाटकर म्हणाले. केशवराव भोसले नाट्यगृहाचे सुशोभिकरण, शहरांतर्गत जलवाहिनी बदलणे, भुयारी गटार योजना, सुजल योजनेतून हाती घ्यायची कामे आदींसाठी निधी मिळावा म्हणून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना चार ते पाचवेळा निवेदने दिली; पण त्यांनी त्याची दखल घेतली नाही. परंतु निवडणुकीच्या तोंडावर २० कोटींचा निधी आणून काँग्रेस, राष्ट्रवादीला बदनाम करण्याचे, सुडाचे राजकारण ते करत आहेत, असे लाटकर म्हणाले. भाजपने जे कामांचे नियोजन केले आहे ते चुकीचे आहे. खासगी जागेत रस्ते धरले आहेत. ज्या कामांना निधी जास्त लागणार आहे, त्यांना केवळ दोन ते तीन लाखांची तरतूद केली आहे. काही कामे आधी मंजूर आहेत त्यावर पुन्हा निधी खर्च केला जाणार आहे. त्यामुळेच आमचा या कामांना विरोध आहे, असे शारंगधर देशमुख म्हणाले. यावेळी उपमहापौर ज्योत्स्ना मेढे-पवार, सभागृह नेता चंद्रकांत घाटगे, परिवहन सभापती अजित पोवार, शिक्षण मंडळ सभापती महेश जाधव, महिला व बालकल्याण सभापती लीला धुमाळ, श्रीकांत बनसोडे, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)२० कोटींच्या निधीबाबत अस्वस्थता का : पालक मंत्रीकोल्हापूर : भाजप सरकारने शहरातील विकासकामांसाठी २० कोटींचा निधी दिला असला तरी त्याचे संपूर्ण नियोजन सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात येत आहे. त्यात काही त्रुटी असतील तर त्या नक्की दुरुस्त केल्या जातील, पण सूचना करण्याऐवजी आगपाखड का केली जाते आहे. निधीबाबत काँग्रेस व राष्ट्रवादीला एवढी अस्वस्थता का? असा सवाल पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला. सुडाचे राजकारण आम्ही नाही तर तेच करत असल्याचा प्रतिआरोपही त्यांनी केला. २० कोटींच्या निधीतून शहरातील विकासकामे केली जाणार आहेत. पालकमंत्री पाटील म्हणाले की, कामांची जागेवर जाऊन पाहणी करावी, असा आग्रह महापालिका प्रशासनाने धरला, त्यानुसार संयुक्त पाहणी झाली. आणखी काही गोष्टी निदर्शनास आल्या तर त्यानुसार बदल करण्यात येतील. पण कॉँग्रेस व राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची एवढी अस्वस्थता का? अगदी दुर्बिण लावून तपासणी करून डोकं खाजवत बसण्यापेक्षा हेच डोकं त्यांनी दुसरीकडे वापरावे.