लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : महाराष्ट्र रायफल असोसिएशनतर्फे पाच जिल्ह्यांत घेण्यात आलेल्या एअरगन नेमबाजी स्पर्धेत ऑलिम्पिक टार्गेट शूटिंग रेंजच्या तिघा नेमबाजांनी यश मिळवले. स्वरा मगदूम, विवेक सावंत व संकेत पाटील अशी त्यांची नावे आहेत.
औरंगाबाद, वाशी, पनवेल, नाशिक, नागपूर याठिकाणी झालेल्या स्पर्धेत १० मीटर एअर रायफल प्रकारात ४०० पैकी ३७८ गुण मिळवून स्वरा मगदूम हिने सब यूथ गटात प्रथम क्रमांक व कनिष्ठ गटात द्वितीय क्रमांक पटकाविला. या प्रकारात विवेक विक्रम सावंत याने ४०० पैकी ३८३ गुण मिळवून वरिष्ठ व कनिष्ठ गटात द्वितीय क्रमांक पटकाविला. संकेत पाटील यानेही ४०० पैकी ३८२ गुण मिळवून वरिष्ठ, कनिष्ठ आणि युवा गटात तृतीय क्रमांक पटकाविला. यासह ओंकार लोहार, समर्थ पाटील, सोहम आळवेकर, सुहास जगदाळे, यांनीही उत्कृष्ट कामगिरी केली. या सर्व नेमबाजांची अहमदाबाद येथे होणाऱ्या ऑल इंडिया जी.व्ही. मावळणकर राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेसाठी निवड झाली. या नेमबाजांना प्रशिक्षक विनय पाटील, तालुका क्रीडा अधिकारी सचिन चव्हाण व संचालक सचिन पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
फोटो : २५०९२०२१-कोल-स्वरा मगदूम
फोटो : २५०९२०२१-कोल-विवेक सावंत
फोटो : २५०९२०२१-कोल-संकेत पाटील