महाराष्ट्र शासनाच्या वतीने सन २०२०-२१मध्ये घेण्यात आलेल्या महाआवास अभियानात पुणे विभाग अंतर्गत पंचायत समिती राधानगरीने तिसरा क्रमांक पटकाविला आहे. हा पुरस्कार विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते सभापती सोनाली पाटील व सहायक गटविकास अधिकारी शरद शिंदे यांनी स्वीकारला. यावेळी शिवाजी पाटील हे उपस्थित होते.
राधानगरी तालुक्याने हे महाआवास अभियान उत्तम प्रकारे राबविले आहे. आवास योजनेचे काम उत्कृष्ट झाले होते. गटविकास अधिकारी संदीप भंडारी यांच्या व आवास योजनेचे प्रमुख उमेश चव्हाण समितीचे अधिकारी, कर्मचारी तसेच तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, सदस्य ग्रामसेवक यांनी घेतलेल्या कठोर परिश्रमामुळे हा विजय मिळविता आला, असे गौरवोद्गार सभापती सोनाली पाटील यांनी काढले. विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पंचायत समितीच्या उल्लेखनीय कामाची प्रशंसा केली. तसेच जि. प. अध्यक्ष राहुल पाटील यांनी जिल्हा परिषदेच्यावतीने सत्कार केला.
या पुरस्कारांसाठी उपसभापती वनिता पाटील, सदस्य दिलीप कांबळे, मोहन पाटील, रवीश पाटील, उत्तम पाटील, कल्पना मोरे, वंदना हळदे, सुशीला भावके, दीपाली पाटील या पंचायत समिती सदस्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
फोटो ओळ = पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना सभापती सोनाली पाटील व सहायक गटविकास अधिकारी शरद शिंदे.