कोल्हापूर : जम्मू-काश्मीर येथे झालेल्या राष्ट्रीय आईस स्टाॅक स्पर्धेत कोल्हापूरच्या यश आण्णासाहेब जाधव-सरनाईक याने कांस्य पदक पटकावले. त्याला जम्मू-काश्मीरचे राज्यपाल मनोज सिन्हा यांच्या हस्ते पदक प्रदान करण्यात आले.
श्रीनगर येथे दि. ९ ते १२ सप्टेंबर दरम्यान झालेल्या या स्पर्धेत महाराष्ट्रासह २३ राज्यांतील संघांनी सहभाग घेतला होता. त्यात यश जाधव-सरनाईकचा समावेश होता. या खेळाचा ऑलिम्पिकमध्ये प्रथमच समावेश करण्यात आला आहे. यश हा दिवंगत माजी आमदार वसंतराव देसाई (आजरा) व केडीसीसी बँकेचे माजी उपाध्यक्ष दिवंगत विश्वनाथ जाधव-सरनाईक यांचा नातू, तर राज्य बँकेचे माजी उपाध्यक्ष बाळासाहेब सरनाईक यांचा पुतण्या आहे. त्याला राष्ट्रीय आईस स्टाॅक फेडरेशनचे अध्यक्ष मोहम्मद इकबाल, महाराष्ट्र संघटनेचे अध्यक्ष महेश राठोड, सचिव अजय सर्वोदय यांचे मार्गदर्शन लाभले.
फोटो : १८०९२०२१-कोल-यश जाधव-सरनाईक