शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

आवाडे-हाळवणकर-कारंडे यांना सत्ता समीकरणे जुळविण्यात यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:20 IST

नगरपालिका विषय समित्यांच्या निवडी अतुल आंबी लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : नगरपालिका विषय समित्यांच्या निवडीवरून ढवळून निघालेल्या राजकीय परिस्थितीतून ...

नगरपालिका विषय समित्यांच्या निवडी

अतुल आंबी

लोकमत न्यूज नेटवर्क

इचलकरंजी : नगरपालिका विषय समित्यांच्या निवडीवरून ढवळून निघालेल्या राजकीय परिस्थितीतून आवाडे-हाळवणकर-कारंडे या तिघांना सत्ता समीकरणे जुळविण्यात यश आले; परंतु गेल्या वर्षभरात एकत्र असूनही पालिकेचा कारभार सुधारण्यात मात्र हलगर्जीपणा झाला आहे. येत्या वर्षभरात पुन्हा नव्याने निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे यावर्षीचा कारभार महत्त्वाचा ठरणार आहे.

नगरपालिकेतील कारभाराविषयी शहरवासीयांत तीव्र संतप्त भावना निर्माण झाल्या आहेत. त्याचा फटका माजी आमदार सुरेश हाळवणकर यांना विधानसभा निवडणुकीत बसला. हाळवणकर यांनी विशेष रस्ते अनुदानातून १०७ कोटी रुपयांचे रस्ते खास इचलकरंजी शहरासाठी मंजूर करून आणूनही त्याचा योग्यवेळी फायदा करून घेता आला नाही. त्याला नगरपालिकेचा कारभारच जबाबदार असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर गतवर्षी नगरपालिकेतील सत्ता समीकरणे बदलून नव्याने आवाडे व कारंडे यांना सोबत घेऊन सत्ता स्थापन करण्यात आली. तीच सत्ता कायम ठेवण्यात तिघांना यावर्षीही यश मिळाले. त्यामध्ये आमदार प्रकाश आवाडे यांनी आमदारकीच्या माध्यमातून कामे करून आणण्यासाठी नगरपालिका सत्तेत राहणे आवश्यक आहे, असे म्हणत ताराराणी आघाडीला हाताशी धरून राजकीय खेळी करत वजनदार खाते आपल्या पारड्यात पाडून घेतले. हाळवणकर यांनी नगरपालिकेच्या कारभारावर आगामी निवडणुकीत आसूड ओढला जाणार आहे. त्यामुळे त्याला सर्वच घटक जबाबदार राहतील, याची दक्षता घेत सावधगिरीने सत्तेत आवाडे-कारंडे या दोघांना सहभागी करून घेतले तर कारंडे यांना बाजूला करून ताराराणी आघाडीशी समीकरणे जुळण्याची शक्यता असल्याने योग्य निर्णय घेत मदन कारंडे यांनी तडजोडीची भूमिका घेऊन सत्तेत सहभाग टिकवला. त्यामुळे तिघांचीही राजकीय खेळी यशस्वी बनली.

चौकटी

कारभार सुधारणार की....

प्रवाहात हात धुऊन घेणे, अशा प्रवृत्ती बाजूला ठेवून प्रामाणिक व निष्ठावंत व्यक्तीच्या हातात एकहाती कारभार दिल्याशिवाय नगरपालिकेच्या कारभारात सुधारणा होणार नाही. त्यामुळे या अखेरच्या वर्षी तिघांकडून काही ठोस हालचाल केली जाते का, पुन्हा ‘येरे माझ्या मागल्या...’ हे महत्त्वाचे ठरणार आहे.

जांभळे गटाचे अस्तित्व अस्पष्ट

विरोधी बाकावर असले तरी सागर चाळके, प्रकाश मोरबाळे हे आपल्या ताराराणी आघाडीचे तसेच शशांक बावचकर हे कॉँग्रेसचे अस्तित्व टिकवून ठेवून सत्ताधाऱ्यांना व प्रशासनाला वेळोवेळी धारेवर धरतात. परंतु सत्तेच्या ‘समीकरणा''तून बाहेर पडलेल्या जांभळे गटाचे मात्र अस्तित्व अस्पष्ट झाले आहे.