लोकमत न्यूज नेटवर्क काेल्हापूर : संजय घोडावत आयआयटी व मेडिकल अकॅडमीच्या २३ विद्यार्थ्यांनी जेईई मेन्स-२०२१ अंतिम परीक्षेत यश संपादन केले. जेईई, सीईटी, एम्स व नीट या स्पर्धा परीक्षांमध्ये उच्चांकी निकालाची परंपरा कायम राखत परीक्षेत ९९ टक्यापेक्षा अधिक गुण मिळवले. अकॅडमीच्या विपुल पाटील-९९.९३, संकेत बाबर-९९.८३, प्रतीक निकम-९९.८०, सिद्धांत सौदत्ती- ९९.७९, कृष्णा बलदवा- ९९.७७, आदित्य देशपांडे- ९९.७६, माधव कदम-९९.७४, हर्षवर्धन भोसले- ९९.७३, सिद्धांत मगदूम-९९.७२, सिद्धार्थ शाह- ९९.७२, वेदांत भंडारे- ९९.६९, पलाश जोशी-९९.६६, प्रणव मगदूम-९९.६५,ओंकार चव्हाण-९९.५९, केदार चौगुले- ९९.५४ टक्के गुण प्राप्त केले. यामध्ये विपुल पाटील याने फिजिक्स व मॅथेमॅटिक्स, प्रणव मगदूम याने फिजिक्स, माधव कदम याने मॅथेमॅटिक्स तर प्रतीक निकम याने फिजिक्स विषयामध्ये १०० टक्के मिळून देशात प्रथम क्रमांक पटकाविला. संजय घोडावत विद्यापीठाचे अध्यक्ष संजय घोडावत व विश्वस्त विनायक भोसले यांनीही सर्व यशस्वी विद्यार्थी, पालक, संचालक वासू व त्यांची पूर्ण टीम यांचे अभिनंदन केले.
‘घोडावत’ अकॅडमीचे ‘जेईई मेन्स’मध्ये यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:26 IST