शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

निधीचे प्रस्ताव १५ मे पर्यंत सादर करा

By admin | Updated: April 17, 2015 00:15 IST

ठिय्या आंदोलन सुरूच : चांदोली प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांबाबत बैठकीत आदेश

कोल्हापूर : चांदोली अभयारण्यग्रस्तांचे पुनर्वसन करण्याकरिता द्याव्या लागणाऱ्या नागरी सुविधा, बुडीत गावांचे भूसंपादन, लाभक्षेत्रातील संपादन, उदरनिर्वाह भत्ता यासंबंधीच्या निधीचे अंदाजपत्रक तयार करून तसा प्रस्ताव १५ मे पर्यंत मंत्रालयात पाठवावा, असे आदेश वन विभागाचे सचिव विकास खारगे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. बुधवारी रात्री उशिरा ही बैठक मुंबईत मंत्रालयात खारगे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. निर्वनीकरणाच्या २१५ हेक्टर जमिनीच्या प्रस्तावाकरिता अपूर्ण असलेल्या कागदपत्रांची पूर्तता कोल्हापूर जिल्हाधिकारी यांनी २३ एप्रिलपर्यंत करावी, अशा सूचनाही यावेळी देण्यात आल्या. १५ जूनपर्यंत निर्वनीकरण प्रस्तावास मंजुरी मिळाल्यावर पुढच्या तीन महिन्यांत प्रकल्पग्रस्तांना जमिनींचे ताबे द्यावेत, असेही कोल्हापूरचे अप्पर जिल्हाधिकारी अजित पवार यांना सांगण्यात आले. चांदोली अभयारण्य प्रकल्प हा १९९५ पूर्वीचा असल्यामुळे प्रकल्पग्रस्तांच्या नागरी सुविधांकरिता लागणाऱ्या एक कोटीपर्यंतच्या निधीला जिल्हाधिकाऱ्यांची, तर पाच कोटींपर्यंतच्या निधीला विभागीय आयुक्तांची परवानगी घेण्यात यावी, असे बैठकीत ठरले. तळसंदे, अंबप या ठिकाणी ६१ हेक्टर ४९ आर जमीन, तर नरंदे येथील १८ हेक्टर जमीन पसंत केली असून, त्याचे प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांना सादर करावेत, असे सांगण्यात आले. या बैठकीला धरणग्रस्तांचे नेते डॉ. भारत पाटणकर, मारुती पाटील, अशोक पाटील, डी. के. बोडके, संतोष गोठल उपस्थित होते, तर जिल्हा प्रशासनाच्यावतीने अप्पर जिल्हाधिकारी अजित पवार, जिल्हा पुनर्वसन अधिकारी शैलेश सूर्यवंशी, जिल्हा उपवन संरक्षक साईप्रसाद, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अधिकारी बारदेस्कर, आदी उपस्थित होते.दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली जोपर्यंत बैठक होत नाही आणि त्यातून ठोस निर्णय होत नाही, तोपर्यंत कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील बेमुदत ठिय्या आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय कायम ठेवला.बेमुदत ठिय्या आंदोलनाचा गुरुवारी ३१वा दिवस होता. (प्रतिनिधी)