शहरं
Join us  
Trending Stories
1
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
2
बोलण्यावर संयम ठेवा, ऑपरेशन सिंदूरवर अनावश्यक विधाने टाळा; PM मोदींच्या BJP नेत्यांना सूचना
3
पुढचा प्लॅन काय? धोनीनं घरची ओढ अन् या गोष्टीवर प्रेम व्यक्त करत असा टाळला तो विषय
4
त्या निवेदनातून माझे नाव वगळा, दुसरे नाव टाका;पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांची ऑडिओ क्लिप व्हायरल
5
भारताला चीनपासून सर्वात मोठा धोका, चहुबाजूंनी घेरण्यासाठी विणतोय जाळं, अमेरिकेच्या गोपनीय अहवालातून गौप्यस्फोट 
6
GT ला मोठा धक्का! CSK वर पहिल्यांदाच आली तळाला राहण्याची वेळ; पण जाता जाता त्यांनी MI ला दिलं गिफ्ट
7
निरा डावा कालव्याला भगदाड..! बारामती परिसरात नागरिकांच्या घरात-शेतात पाणीच पाणी
8
धक्कादायक! चेंजिंग रूममध्ये कॅमेरा बसवला होता, महिलांचे कपडे बदलतानाचे व्हिडीओ व्हायरल
9
'...तर तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही', जरांगे पाटलांचा मुख्यमंत्री फडणवीसांना थेट इशारा
10
"मी एका खोलीच्या घरात राहतो, कर्जबाजारी..."; सीबीआयच्या आरोपपत्रावर सत्यपाल मलिक म्हणाले,...
11
पीएम मोदींचा पाकिस्तान दौरा अन् 2016 चा पठाणकोट हल्ला..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
12
ऑपरेशन सिंदूरमधील नामुष्कीनंतर पाकिस्तान सुधरेना, अण्वस्त्रांबाबत रचतोय भयंकर डाव, अमेरिकेच्या अहवालातून गौप्यस्फोट
13
दुसरी मुलगी झाली म्हणून टोमणे; अमरावतीत ‘सीएचओ’ची आत्महत्या
14
व्लादिमीर पुतीन यांच्या हेलिकॉप्टरवर युक्रेनकडून ड्रोन हल्ला, बालंबाल बचावल्याचं वृत्त   
15
Monsoon Update : आनंदाची बातमी! या राज्यांमध्ये मान्सूनचे दमदार आगमन; मुसळधार पावसाचा इशारा, महाराष्ट्रात कधी येणार?
16
GT चं काही खरं नाही; तळाला असलेल्या CSK च्या बॅटर्संनी केला मोठा धमाका
17
रशियाने युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला केला, ३६७ ड्रोन, क्षेपणास्त्रे डागली
18
Tejashwi Yadav : “मला हे आवडत नाही आणि मी ते सहनही करू शकत नाही”; तेजस्वी यादव यांनी स्पष्टच सांगितलं
19
मोदींच्या नेतृत्वात एनडीएचे जोरदार शक्तीप्रदर्शन; २० मुख्यमंत्री, १७ उपमुख्यमंत्री बैठकीला हजर...
20
'आमच्या 24 कोटी लोकांचे जीवन...', पाकिस्तानची सिंधू पाणी करारासाठी UN मध्ये धाव

‘न्यूट्रीयन्टस’वर दरोड्याचा गुन्हा दाखल करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2017 18:45 IST

कोल्हापूर : हलकर्णी (ता. चंदगड) येथील न्यूट्रीयन्टस कंपनीने जिल्हा बँकेच्या ताब्यात साखर परस्पर विक्री करून मोठा गुन्हा केला असून संबंधितांवर दरोड्याचा गुन्हा दाखल करा व त्यांच्याशी केलेला भाडेकरार रद्द करा, अशी मागणी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने केली. जिल्हाप्रमुख विजय देवणे व संजय पवार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मागणीचे निवेदन सोमवारी बँकेचे अध्यक्ष आमदार ...

ठळक मुद्देशिवसेनेची जिल्हा बँकेकडे मागणी भाडेतत्त्वाचा करार रद्द करा

कोल्हापूर : हलकर्णी (ता. चंदगड) येथील न्यूट्रीयन्टस कंपनीने जिल्हा बँकेच्या ताब्यात साखर परस्पर विक्री करून मोठा गुन्हा केला असून संबंधितांवर दरोड्याचा गुन्हा दाखल करा व त्यांच्याशी केलेला भाडेकरार रद्द करा, अशी मागणी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने केली. जिल्हाप्रमुख विजय देवणे व संजय पवार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मागणीचे निवेदन सोमवारी बँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांना दिले.

जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष म्हणून काम करणाºया व्यक्तीशी संबंधित कंपनीनेच अशी चोरी करणे नामुष्कीजनक असून जो व्यक्ती बँकेत राहून बँकेलाच चुना लावत असेल तर शेतकºयांचे काय कल्याण करणार? असा सवाल करत त्यांच्याशी केलेला भाडेकरार रद्द करण्याची मागणी विजय देवणे यांनी केली. साखर चोरीप्रकरणी बँकेने पोलिसांत तक्रार दिली आहे, पण केवळ चोरीचा गुन्हा दाखल करून या प्रवृत्तीला चाप बसणार नाही. ट्रक लावून राजरोसपणे बँकेच्या मालमत्तेवर दरोडा घातल्याने संबंधितांवर दरोड्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणी संजय पवार यांनी केली.

‘दौलत’च्या थकबाकीमुळे बँक अडचणीत आली होती, हा कारखाना कोणी भाडेतत्त्वावर घेण्यास तयार नव्हते. त्यावेळी ‘न्यूट्रीयन्टस’ कंपनीने पुढे येऊन करार केला, त्याप्रमाणे मार्च २०१७ अखेर ३४ कोटी रुपये भरले. त्यानंतर त्यांना आर्थिक अडचणी आल्याने शेतकरी, कामगारांची देणी थकली. आता करार रद्द केला तर ते न्यायालयात जातील आणि कारखानाच बंद पडेल, असे जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी सांगितले. यावेळी प्रभाकर खांडेकर, अशोक मनवाडकर, संग्राम अडकूरकर आदी उपस्थित होते.-आगामी हंगामाची साशंकताच

शेतकºयांचे ‘एफआरपी’प्रमाणे पैसे न दिल्याने कारखान्याला ऊस कोणी घालतील, अशी आजची परिस्थिती नाही. त्यामुळे कारखाना चालविण्याची त्यांचीच मानसिकता राहणार नसल्याने ते स्वत:च करार रद्द करण्याची शक्यता असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.

हेपन्नावारांना जरा दाखवणार का?

‘न्यूट्रीयन्टस’चे मालक कोण आहेत? अशी विचारणा करत जरा या प्रकाश हेपन्नावारांना आम्हाला दाखवणार का? अशी विचारणा विजय देवणे यांनी केली. यावर आतापर्यंत ते कधीच बँकेत आलेले नाहीत, त्यांचे कार्यकारी संचालक शिर्के यांच्याशी व्यवहार सुरू असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.