शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

डॉल्बीचे खटले तत्काळ दाखल करा

By admin | Updated: September 20, 2016 00:58 IST

प्रदीप देशपांडे : सोळा मंडळांविरोधात भक्कम पुरावे गोळा करावेत

कोल्हापूर : सार्वजनिक गणेशोत्सव मिरवणुकीत डॉल्बी लावून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १६ मंडळांवर गुन्हे दाखल केले आहेत. या मंडळांविरोधात भक्कम पुरावे गोळा करून तत्काळ खटले न्यायालयात दाखल करा, असे आदेश पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांनी विशेष पथकास सोमवारी दिले. देशपांडे यांनी सोमवारी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात बैठक घेतली. यावेळी त्यांनी डॉल्बी लावणाऱ्या मंडळांवर खटले दाखल करण्यासाठी विशेष पथकाकडून माहिती घेतली. निरीक्षक अनिल देशमुख यांनी पुरावे गोळा करण्याचे काम सुरू असून, त्यासाठी ध्वनिक्षेपक मापन यंत्र, व्हिडिओ चित्रीकरण, फोटो, प्रसारमाध्यमातील बातम्यांचा आधार घेतल्याची माहिती दिली. त्यानुसार वाघाची तालीम मंडळ (उत्तरेश्वर पेठ), फिरंगाई तालीम मंडळ, बी. जी. एम. स्पोर्टस्, राजे संभाजी तरुण मंडळ (शिवाजी पेठ), पिंटू मिसाळ बॉईज (लक्षतीर्थ वसाहत), पाटाकडील तालीम मंडळ, प्रॅक्टिस क्लब-सुबराव गवळी तालीम मंडळ, नंगीवली तालीम मंडळ (मंगळवार पेठ), आझाद हिंद तरुण मंडळ-दयावान ग्रुप (ताराबाई रोड), बाबूजमाल तालीम मंडळ (गुरुवार पेठ, ताराबाई रोड), हिंदवी स्पोर्टस् (ताराबाई रोड), कै. उमेश कांदेकर युवा मंच, क्रांती बॉईज, रंकाळवेश तालीम मंडळ (सर्व रंकाळा टॉवर), गणेश तरुण मंडळ (राजारामपुरी १२वी गल्ली), बागल चौक मित्रमंडळ, आदी मंडळांचे व्हिडिओ चित्रीकरण केले आहे. डॉल्बी सिस्टीम लावलेल्या मंडळांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, पदाधिकारी, तसेच डॉल्बीचे मालक व चालक यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. बैठकीस शहर पोलिस उपअधीक्षक भारतकुमार राणे, पोलिस निरीक्षक तानाजी सावंत, अमृत देशमुख, प्रवीण चौगुले, आदींसह कर्मचारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)