शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

रंकाळा शुद्धिकरणाचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ सादर करा

By admin | Updated: May 19, 2016 00:41 IST

हरित लवादाचा आदेश : प्रदूषणमुक्तीस मुदतवाढ देण्यास नकार

कोल्हापूर : रंकाळा तलावाच्या शुद्धिकरणासाठी व प्रदूषणमुक्तीसाठी जास्त वेळ देण्यास महापालिकेस नकार देत हरित लवादाने महाराजा सयाजीराव (एम. एस.) विद्यापीठ बडोदा यांनी दिलेल्या अहवालाच्या अंमलबजावणीसाठी कालबद्ध कृती कार्यक्रम (अ‍ॅक्शन प्लॅन) दोन आठवड्यांत सादर करण्याचे आदेश बुधवारी कोल्हापूर महापालिकेस पुण्यातील राष्ट्रीय हरित लवादाच्या न्यायाधीश जावेद रहिम व तज्ज्ञ सदस्य अजय देशपांडे यांच्या खंडपीठाने दिले. या प्रकरणाची पुढील सुनावणी १ जुलैपर्यंत तहकूब केली. सुनील केंबळे यांच्या याचिकेवर आज सुनावणी झाली. रंकाळा तलावाच्या राष्ट्रीय सरोवर संवर्धन प्रकल्प १ व प्रस्तावित १२५ कोटी रुपयांच्या प्रकल्प २ वर हरित लवादाने साशंकता व्यक्त करत मागील काही सुनावणींदरम्यान महाराजा सयाजीराव विद्यापीठाच्या पर्यावरण विभागास पाचारण करत वरील दोन्ही प्रकल्पांची छाननी करून प्रत्यक्ष रंकाळा तलावाची पाहणी करून अहवाल सदर करण्याचे आदेश दिले होते. त्यावर विद्यापीठाच्या समितीने दोन दिवस रंकाळा तलावाची पाहणी करून प्रस्तावित १२५ कोटींचा प्रकल्प खर्चिक व अनावश्यक असल्याचे अहवालात म्हटले आहे. महापालिकेने नेमलेल्या खासगी कंपनीच्या एकूणच अहवालावर गंभीर सवाल उपस्थित केला. त्यावर बुधवारच्या सुनावणीत महापालिकेने म्हणणे मांडले. महापालिकेचे वकील धैर्यशील सुतार यांना खंडपीठाने बडोदा विद्यापीठाचा अहवाल तुम्ही स्वीकारता आहात का, असा सवाल केला. त्यावर सुतार यांनी आम्ही तत्त्वत: अहवालाशी सहमत असल्याचे म्हटले पण गाळ काढणे व इतर काही गोष्टींवर पुन्हा एकदा महापालिका अभ्यास करू इच्छिते, असे निवेदन केले. त्यावर या अहवालाची तुम्ही किती दिवसांत अंमलबजावणी करणार आहात, अशी विचारणा खंडपीठाने महापालिकेस केली. त्यावर वकील सुतार यांनी अभ्यासासाठी ६ महिने व पुढील निधी उपलब्ध करून अंमलबजावणीसाठी २ वर्षांची मुदत आवश्यक असल्याचे सांगितले पण त्यावर इतका वेळ देण्यास खंडपीठाने नकार दिला.‘प्रकल्प दोन’ बारगळणारबडोदा विद्यापीठाच्या अहवालावर लवादाने भर दिला व त्याची अंमलबजावणी करण्याचा कार्यक्रम महापालिकेस सादर करण्यास सांगितले. त्यावरून प्रस्तावित राष्ट्रीय सरोवर संवर्धन ‘प्रकल्प टप्पा दोन’ हा सुमारे १२५ कोटी रुपयांचा प्रकल्प बारगळल्यात जमा असल्याचे स्पष्ट झाले.