हातकणंगले पंचायत समितीकडे डॉ. शबाना मोकाशी सहा महिन्यांपूर्वी हजर झाल्या. यापूर्वी त्यांनी कागल पंचायत समितीकडे काम केले आहे. गटविकास अधिकारी पदाचा पदभार घेताच त्यांनी तालुक्यातील गावा-गावातील तक्रारींचा निपटारा करण्यासाठी पंचायत समितीच्या योजनांनुसार आढावा घेण्यासाठी प्रत्यक्ष पाहणीचा दौरा केला. तालुक्यातील हेरले, अतिग्रे, रुकडी, माणगाव, चंदूर, पट्टणकोडोली या सहा गावांमध्ये सुरू असलेल्या रोजगार हमीच्या पाणंद रस्त्यांच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली आणि मजुरांऐवजी मशिनरींनी केलेल्या बोगस कामाची बिले थांबवली. यामध्ये पंचायत समिती सदस्यांनी नेमलेल्या ठेकेदारांची बिले अडकल्यामुळे गटविकास अधिकाऱ्यावर रोष व्यक्त करून त्यांच्याविरुद्ध कारवाया सुरू केल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.
प्रशासनावर दबाव टाकण्यासाठी बदलीचा विषय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:24 IST