शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
2
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
3
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
4
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
5
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
6
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
7
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
8
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
9
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर
10
शाम्पू, लोशन आणि बॉडी सोपमध्ये असतात कॅन्सर होणारे केमिकल्स; धडकी भरवणारा रिसर्च
11
जिगरबाज...! समुद्रात बुडणाऱ्या महिलेला वाचविण्यासाठी वाहतूक पोलिसाची पाण्यात उडी
12
'हा भारताचा स्पष्ट विजय', जगातील सर्वात प्रतिष्ठित संरक्षण तज्ज्ञाने पाकिस्तानला दाखवला आरसा
13
“इस व्यक्ति को जानते हैं?” WhatsApp वरचा 'हा' मेसेज अन् फोटो करू शकतो बँक खातं रिकामं
14
Recruitment: भारतीय लष्करात भरती होण्याची संधी; नेमकं काम काय? कोण करू शकतं अप्लाय? कधी? आणि कसं?... इथे वाचा!
15
जुन्या भांडणावरुन बाप-लेकाचा चाकू अन् लोखंडी पाईपने खून, बदनापूरमधील धक्कादायक घटना
16
BJP District President: ६ विभागात ५८ जिल्हाध्यक्षांची नियुक्ती; भाजपानं दिली नव्या चेहऱ्यांना संधी, वाचा यादी
17
युद्धविरामानंतरही डिफेन्स स्टॉक्स तेजीत; PM मोदींच्या विधानाने बदललं गणित
18
बाबा वेंगा यांची पाकिस्तानबाबत धक्कादायक भविष्यवाणी! ६ वर्षापूर्वी अभ्यासात उल्लेख होता
19
पाकिस्तानला काही सुधरेना! सिंधू जल करारावरून परराष्ट्र मंत्र्यांची दर्पोक्ती; म्हणे, तर युद्धविराम भंग होऊ शकतो!
20
Mumbai Metro 3: तुम्हाला माहित्येय का? सिद्धिविनायक मेट्रो स्टेशनला आहेत एकूण 7 Entry-Exit मार्ग, जाणून घ्या...

अ‍ॅम्ब्युलन्समधून परीक्षा देणारा विद्यार्थी ‘फर्स्ट क्लास’

By admin | Updated: May 28, 2015 01:00 IST

जिद्दी तरुणाची कहाणी : कुटुंबीयांसह मित्रांमध्येही आनंदाचे वातावरण

कऱ्हाड : बारावी परीक्षेच्या कालावधीत एखादी अनुचित घटना घडली तर त्याचा दूरगामी परिणाम विद्यार्थ्याच्या भावी आयुष्यावर होतो. असाच काहीसा प्रकार कऱ्हाडातील नितीन चव्हाण या परीक्षार्थी विद्यार्थ्याबाबत घडला होता. परीक्षेच्या दोन दिवसांपूर्वी नितीनला हृदयविकाराचा धक्का बसला होता. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले; पण परिस्थितीसमोर हार न मानता नितीनने महाविद्यालयाच्या आवारात अ‍ॅम्ब्युलन्समध्ये बसून बारावीचा पेपर दिला होता. अ‍ॅम्ब्युलन्समध्ये बसून परीक्षा देणारा हा नितीन बारावी परीक्षेत ‘फर्स्ट क्लास’मध्ये ६५ टक्क्यांपेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण झाला आहे. त्याच्या जिद्द व मेहनतीने पालकांसह शहरवासीयही भारावून गेलेत. कऱ्हाडच्या गाडगे महाराज महाविद्यालयाचा विद्यार्थी नितीन संजय चव्हाण याने बारावी परीक्षेसाठी तयारी केलेली. २१ फेब्रुवारी रोजी त्याचा बारावीचा पहिला पेपर होता. या पेपरचा त्याचा अभ्यासही पूर्ण होत आलेला. मात्र, अशातच १८ फेब्रुवारीला रात्री झोपेतच नितीनला हृदयविकाराचा धक्का बसला. त्यामुळे त्याला उपचारार्थ रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात नितीनवर उपचार सुरू झाले. नितीन मृत्यूशी झुंज देत होता. दुसऱ्या दिवशी तो शुद्धीवर आला खरा; पण त्याने बारावीची परीक्षा देण्याची इच्छा बोलून दाखविली. अखेर याबाबत डॉक्टरांशी चर्चा करून कुटुंबीयांनी नितीनला पेपरसाठी अ‍ॅम्ब्युलन्समधून महाविद्यालयात नेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार महाविद्यालयाच्या आवारात थांबविण्यात आलेल्या रुग्णवाहिकेतच नितीनने बारावीचा पहिला पेपर दिला. त्यापुढील सर्व पेपरही नितीनने अशाच पद्धतीने दिले. आज बारावीचा निकाल जाहीर झाला. नितीनच्या कुटुंबीयांनी तातडीने नितीनचा निकाल आॅनलाईन पाहिला आणि त्यावेळी त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. नितीन बारावीत ६५ टक्क्यांपेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण झाला. (प्रतिनिधी)