शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

नापास विद्यार्थ्यांनी दुसऱ्यास शिकवू नये

By admin | Updated: October 27, 2015 00:05 IST

नीलम गोऱ्हे : अशोक चव्हाण यांना टोला

सांगली : परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांनी दुसऱ्याला पेपर लिहायला शिकवायचा नसतो. त्यामुळे अशोक चव्हाण यांनी त्यांच्या पक्षाचे अपयश लपवून शिवसेनेला सल्ला देण्याचा प्रयत्न करू नये, असा टोला शिवसेनेच्या प्रवक्त्या नीलम गोऱ्हे यांनी सोमवारी सांगलीत पत्रकारांशी बोलताना लगावला. त्या म्हणाल्या की, आदर्श घोटाळा उजेडात आल्यानंतर अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागले होते. त्यानंतर पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री झाले. सत्तेत घटकपक्ष असलेल्या राष्ट्रवादीने तेव्हा लकवा आलेला मुख्यमंत्री म्हणून त्यांच्यावर टीका केली होती. सत्तेत असूनही अशा टीका त्यावेळी झाल्या होत्या. त्यामुळे शिवसेनेने लोकहितासाठी एखाद्या गोष्टीसाठी सरकारी धोरणावर टीका केली म्हणून दुटप्पी भूमिका घेतली असे समजू नये. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उद्धव ठाकरे यांनी हे सरकार स्थिर ठेवणार असल्याचे यापूर्वीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे मध्यावधी निवडणुकांच्या अपेक्षा त्यांनी खुशाल बाळगल्या तरी चालतील. त्यांच्या अपेक्षा पूर्ण होणार नाहीत. याकुब मेमनच्या दयेसाठी समर्थन करणाऱ्या कॉँग्रेस सरकारने आम्हाला कोणताही सल्ला देऊ नये. देशद्रोह करणाऱ्या व्यक्तीला धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली पाठिंबा देणाऱ्यांना तसा कोणताही अधिकार नाही. सिंचन घोटाळ्याची सध्या चौकशी सुरू आहे. याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे, असे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)कौल योग्यच...विद्यमान सरकारच्या एक वर्षाच्या कालावधीनंतर ‘लोकमत’ने जनतेचा कौल घेतला आहे. यामध्ये जनतेने सरकारला दहापैकी ५.७२ गुण दिले होते. त्याचा उल्लेख करीत गोऱ्हे यांनी, लोकांचा हा कौल योग्यच असल्याचे सांगितले. शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख आप्पासाहेब काटकर यांच्या कुटुंबियांचे सांत्वन गोऱ्हे यांनी सोमवारी केले. यावेळी आप्पासाहेब यांच्या पत्नी सुनंदा, पुत्र शिवराज, शंभोराज यावेळी उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी काँग्रेस नेते मदन पाटील यांच्या कुटुंबियांचेही सांत्वन केले. गटबाजी नव्हे, मतभेद!जिल्ह्यातील शिवसेनेत गटबाजी नाही. किरकोळ स्वरूपातील काही मतभेद त्यांच्यात आहेत. ते दूर करण्याचा प्रयत्न आम्ही करू, असे त्यांनी सांगितले. खासदार कमी पडलेजिल्ह्यातील सिंचन योजनांना केंद्र शासनाकडून ज्या गतीने निधी मिळायला हवा होता, तेवढा मिळाला नाही. खासदार संजय पाटील याबाबतीत कमी पडल्याचे दिसते, असे त्या म्हणाल्या.