शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

सुरळीत बससेवेसाठी विद्यार्थ्यांचे आंदोलन

By admin | Updated: January 6, 2015 00:46 IST

शिराळ्यातील प्रकार : बस अडवून रस्त्यावरच ‘अभ्यास’

शिराळा : शिराळा-बेलवडे ही सायंकाळी सहाला सुटणारी बस रात्री आठपर्यंत सुटत नसल्यामुळे संतप्त झालेल्या विद्यार्थी, नागरिक, महिलांनी आज (सोमवारी) शिराळा बसस्थानकावर बसेस अडवून, तर विद्यार्थ्यांनी रस्त्यावरच पुस्तके-वह्या काढून अभ्यास करण्याचे अनोखे आंदोलन केले. अखेर आगारप्रमुख जे. डी. पाटील यांनी ही बस वेळेत सोडण्याचे आश्वासन दिल्यावर आंदोलन स्थगित करण्यात आले.शिराळा-बेलवडे बसची ६ वा. सुटण्याची वेळ आहे. शाळा पाचच्या दरम्यान सुटतात. एस.टी. बसस्थानकात मुले आली की रात्री ८ पर्यंत बस स्थानकावर लागत नाही. त्यामुळे लहान मुले, विद्यार्थ्यांना तीन-तीन तास ताटकळत बसावे लागते. घरी वेळेवर पोहोचता येत नाही. पालकांनी बसस्थानकावर दूरध्वनी केला की उध्दट उत्तरे मिळतात. विद्यार्थ्यांही अशीच उत्तरे मिळतात. ही बस वेळेत सोडावी, यासाठी माजी सरपंच इब्राहिम मुलाणी यांनी १५ डिसेंबरपासून पत्रव्यवहार केला; मात्र प्रतिसाद मिळाला नाही.यामुळे आज मुलाणी यांच्यासह माजी सरपंच रघुनाथ धुमाळ, विलास पाटील, अरुण पाटील, तुकाराम नांगरे, ७२ वर्षांच्या लीलाताई हसबनीस, संगीता कांबळे यांच्यासह विद्यार्थ्यांनी रास्ता रोको केला. शाळेच्या विद्यार्थ्यांनी पुस्तके, वह्या काढून रस्त्यावरच अभ्यास सुरू केला. जवळजवळ अर्धा तास आंदोलन सुरू होते. त्यानंतर आगारप्रमुख पाटील यांनी ही बस सहाला वेळेत सोडण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिले. यावेळी स्थानकप्रमुख सौ. व्ही. एस. चौगुले, अविनाश शिंदे, बी. डी. खोत उपस्थित होते. (वार्ताहर)...तर पुन्हा आंदोलनाचा इशाराही गाडी शिराळा, शिरशी, धामवडे, गिरजवडे, मानकरवाडी, बेलवडे या डोंगरी भागात प्रवास करते. ती वेळेत न सुटल्यास विद्यार्थ्यांना रात्री दहा-दहा वाजतात. ही गाडी साडेपाचला सुटण्याची लेखी मागणीही आंदोलनकर्त्यांनी दिली. जर गाडी वेळेत सुटली नाही तर, पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा दिला.