शहरं
Join us  
Trending Stories
1
खासदाराच्या ड्रायव्हरला १५० कोटी रुपयांची जमीन कोणी भेट दिली?,चौकशी सुरू
2
ना नतांज, ना फोर्डो...! इस्रायलच्या नादात अमेरिकाही फसली? इराणने चकवत दुसरीकडेच सिक्रेट अण्वस्त्र अड्डा बनविलेला...
3
"राजकारणात फक्त आशिष शेलारांना ओळखते..."; ठाकरे बंधूंच्या मराठी मोर्चावर आशा भोसले काय म्हणाल्या?
4
अदानींनी खरेदी केली आणखी एक कंपनी, किती कोटींना झाली डील? शेअर्स सुस्साट...
5
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
6
तुम्ही ज्या विमानातून प्रवास करणार, ते किती जुने? सर्व्हिसिंग कधी केलेली? अशाप्रकारे जाणून घ्या...
7
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासाठी १९ इनोव्हा मागवल्या, डिझेल भरायला गेल्या आणि पाणी भरून आल्या...
8
घरात सापडली संशयास्पद कागदपत्रे, पती देशद्रोही तर नाही ना? महिलेला आला संशय, त्यानंतर उचललं असं पाऊल   
9
आज दोघं एक पाऊल पुढे आलेत, भविष्यात एकत्र दिसतील ही खात्री; ठाकरे बंधूंचे मामा काय बोलले?
10
" हा तर गमावलेली राजकीय स्पेस मिळवण्याचा प्रयत्न, यांना मराठी भाषेशी…’’, ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चाची भाजपाकडून खिल्ली
11
Jagannath Rath Yatra 2025: जगन्नाथाच्या मूर्तीला डोळे, नाक आणि ओठ एवढेच अवयव का? त्यामागे आहे रहस्यमय कथा!
12
संजय लीला भन्साळींसोबत करीनाचं असं आहे नातं, विकीसमोर केला खुलासा, म्हणाली - "लव्ह अ‍ॅण्ड वॉरवाला..."
13
सरकारी नोकरीसाठी फक्त परीक्षा पास होणे पुरेसे नाही? CIBIL स्कोअरही महत्त्वाचा; एकाची नियुक्ती रद्द
14
जगन्नाथ रथयात्रेत मोठी घटना टळली! १८ हत्तींचे नेतृत्व करणाराच हत्ती बिथरला, अन्...
15
'बाप माणूस' KL राहुलनं असं जपलं टीम इंडियातील आपल्या जबाबदारीचं भान!
16
चीनमध्ये गाढवे का गायब होत आहेत? ५८,००० कोटी रुपयांचा व्यवसाय संकटात? काय आहे प्रकरण?
17
₹२ च्या मजुरीपासून ते ₹२००० कोटींच्या मालक; पद्मश्री मिळवणाऱ्या अकोल्याच्या कल्पना सरोज यांचा कसा होता प्रवास
18
Maharashtra Politics : "मला खूप आनंद झाला, सुरुवात चांगली झाली"; ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चावर मनसे नेत्याने स्पष्टच सांगितलं
19
"मराठी माणसाच्या हितासाठी..." मनसे प्रमुख राज ठाकरेंचा संजय राऊतांना फोन, काय झाला संवाद?

विद्यार्थी भीतीच्या छायेखाली

By admin | Updated: January 10, 2015 00:36 IST

सूरज पोवार मृत्यू प्रकरण : पोलीस बंदोबस्त; पालकांनी मुलांना घरी बोलावले

कोल्हापूर : पाचगाव (ता. करवीर) येथील राजर्षी छत्रपती शाहू आश्रमशाळेचा विद्यार्थी सूरज शामराव पोवार याच्या मृत्यूनंतर आज, शुक्रवारी या शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांनी मुले नेण्यास सुरुवात केली. करवीर पोलिसांनी शाळेच्या आवारात पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. दरम्यान, याप्रकरणी शाळेतील अधीक्षक, दोन विद्यार्थी यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त, मारहाण असे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आज या प्रकरणी गांधीनगर पोलिसांकडून कोणास अटक करण्यात आली नसल्याचे सहायक पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी सांगितले.शिक्षकांनी वारंवार सूरज पोवार याची अवहेलना केली. यामधून सूरजने उचगाव (ता. करवीर) येथे घरामध्ये जाळून घेतले. यामध्ये तो काल, गुरुवारी राजारामपुरीतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. याचा उद्रेक होऊन शाळेतील अधीक्षक संशयित कांतू जाधव (रा. सोलापूर) व इतरांना अटक झाल्याशिवाय शांत बसणार नाही, असा आक्रमक पवित्रा पोलिसांसमोर घेतला. त्यानुसार गांधीनगर पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. आज सकाळपासून या शाळेतील विद्यार्थ्यांचे पालक पाल्यांना नेण्यासाठी या ठिकाणी येत होते, तर या ठिकाणी पोलिसांनी बंदोबस्त ठेवला आहे. मुख्यालयातील ११ व करवीर पोलीस ठाण्याचे चार असे १५ पोलीस बंदोबस्तासाठी आहेत. या आश्रमशाळेत सुमारे १३० पटसंख्या आहे. यातील सुमारे शंभर मुलांना सूरज पोवार यांच्या मृत्यूच्या घटनेनंतर त्यांच्या पालकांनी नेले आहे. त्याचबरोबर शाळाही बंद स्थितीत असून शिक्षकांनी याकडे पाठ फिरविली आहे. (प्रतिनिधी)सूरजला आश्रमशाळेची श्रद्धांजलीकाल, गुरुवारी सकाळी आश्रमशाळा सुरू होती. पहिली ते नववीपर्यंतचे याठिकाणी शिक्षण सुरू आहे. सूरज हा मृत झाल्याचे समजताच आवारातील फलकावर त्याला श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर शाळा सोडण्यात आली. आज दिवसभर काही मुले शाळा नसल्याने शाळेतील मैदानावर दंग होती, तर काही मुले भीतीच्या छायेखाली वावरत होती.