शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन हजारांवर काॅटेज, हाॅटेलमध्ये ‘सर्च ऑपरेशन’; संशयास्पद ‘बोटी’च्या संदेशानंतर पोलिस ‘अलर्ट’
2
पुढील काही महिने पृथ्वी वेगाने फिरणार; भविष्यात घड्याळाची वेळ बदलावी लागणार, ९ जुलैला काय घडलं?
3
रात्री ज्याला चोर म्हणून तुडवला, त्यालाच सकाळी जावई बनवला! रात्रभरात असं नेमकं घडलं काय? 
4
आजचे राशीभविष्य: या राशींसाठी लग्न जुळण्याचा योग, व्यापार - व्यवसायात फायदा होणार, चांगला दिवस
5
समलैंगिक संबंध, ब्लॅकमेलिंग अन् शेवट...; मुंबईतील ३ घटना, ३ मृत्यू, नेमकं काय घडले?
6
५० लाख नागरिकांना मिळणार जागेची मालकी; तुकडेबंदी कायदा तूर्त शिथिल, नंतर रद्द करणार
7
...तर खराब रस्त्यांसाठी नागरिकांनी या आमदारांना का मारू नये?; टॉवेल बनियनवर गावगुंडासारखा राडा
8
विद्यार्थिनींची अंतर्वस्त्रे उतरवली, कारण...; शहापूरच्या खासगी शाळेतील अत्यंत घृणास्पद प्रकार
9
सोळावं वरीस धोक्याचं... किशोरवयातच प्रौढपण; खेळण्याच्या वयात मुली पडतायेत वासनेचा बळी
10
मतदारांच्या कमाल संख्येनुसार मतदान केंद्रे; निवडणूक आयोगाचे निर्देश, एका इमारतीत आता १० केंद्रे
11
पंढरीचे ‘एआय’ वारकरी! AI ने केली २७ लाख लोकांची गर्दी मोजण्याची किमया
12
निवडणूक आयोग जनतेला मूर्ख समजतो की काय?; रोखठोक प्रश्न विचारणं आवश्यक बनलंय
13
महासंचालकांचे परिपत्रक सर्व पोलिसांवर बंधनकारक नाही का?; अपूर्ण केस डायरीवरून उच्च न्यायालय संतापले
14
मृत घोषित केलेले बाळ अंत्यसंस्कारावेळी रडले; अंबाजोगाईच्या रुग्णालयात धक्कादायक प्रकार
15
‘आई’ व्हा! शाळकरी मुलींनाही 'या' देशानं दिलं आमिष; मुलं जन्माला घातली तर मिळणार १ लाख
16
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...
17
शाळेत शिकणारी मुलगी प्रेगनंट राहिल्यास १ लाख रुपये मिळणार; रशियाच्या या योजनेची होतेय चर्चा
18
मीरारोडचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली; मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्रीही वैतागले
19
पुन्हा रॉकेट बनला MRF चा शेअर, गेला ₹ 150000 पार; लोकांना केलं मालामाल! दिला बंपर परतावा
20
“महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये वापरायचा भाजपा, निवडणूक आयोगाचा प्रयत्न”: सपकाळ

किमान वेतनासाठी पुन्हा संघर्ष

By admin | Updated: May 13, 2015 00:55 IST

यंत्रमाग कामगार : विविध परिषदांतून राज्यव्यापी लढ्याची तयारी पूर्ण

राजाराम पाटील - इचलकरंजी -यंत्रमाग क्षेत्रातील कामगारांसाठी सुधारित किमान वेतन जाहीर करावे, या मागणीसाठी सातत्याने तीस वर्षे कामगार संघटना संघर्ष करीत आहे. अखेर उच्च न्यायालयात शासनाने किमान वेतनाची अधिसूचना जारी केली. त्याला तीन महिने उलटले, तरी त्याची अंमलबजावणी होत नाही म्हणून कामगार संघटनांनी पुन्हा ‘एल्गार’ पुकारला आहे. तर उच्च न्यायालयाच्या आदेशाची शासन पायमल्ली करीत असल्याबद्दल शासनाच्या विरोधात अवमान याचिका दाखल करण्याची तयारी दिली आहे.यंत्रमाग कामगारांना कुटुंबीयांच्या उपजिविकेसाठी पुरेसे वेतन मिळावे म्हणून महाराष्ट्रात प्रथम सन १९६७-६८ मध्ये इचलकरंजीमध्येच यंत्रमाग कामगारांचा लढा उभा राहिला. त्यावेळी तत्कालीन कामगार नेते कै. शांताराम गरूड, कै. एस. पी. पाटील, कै. के. एल. मलाबादे, नाना भोजे, आदींनी आंदोलन केले. त्यानंतरच्या प्रत्येक टप्प्यांवर सोलापूरचे माजी आमदार नरसय्या आडाम, इचलकरंजीचे कै. सूर्याजी साळुंखे, दत्तात्रय माने, शिवगोंड खोत, भरमा कांबळे, प्राचार्य ए. बी. पाटील, कृष्णात कुलकर्णी, शामराव कुलकर्णी, मिश्रीलाल जाजू, हणमंत लोहार, मारुती आजगेकर, आदींनी आपापल्यापरीने वारंवार आंदोलने उभी केली आणि ती चालविली.शासनाने यापूर्वी अनेकदा किमान वेतनाच्या निश्चितीसाठी समित्या स्थापन केल्या. त्यांचे अहवाल स्वीकारले. मात्र, त्यानंतर त्याची वाच्यताच झाली नाही. अगदी इचलकरंजीचे तत्कालीन आमदार प्रकाश आवाडे, सोलापूरचे आमदार नरसय्या आडाम व विद्यमान आमदार सुरेश हाळवणकर यांच्या अध्यक्षतेखाली समित्या स्थापन झाल्या. या आमदारांनी माथाडी कामगारांच्या धर्तीवर यंत्रमाग कामगारांसाठी कल्याण मंडळ स्थापन करावे, अशा सूचना मांडल्या. तसेच वेतन, प्रॉव्हिडंट फंड, ग्रॅच्युईटी, दीपावली बोनस, विमा संरक्षण, घरकुले, आदींच्या सुद्धा शिफारशी केल्या. या सर्व शिफारशी शासनाने बासनात बांधून ठेवल्या आहेत.अखेर लालबावटा सायझिंग-वार्पिंग कामगार संघटनेच्यावतीने प्राचार्य ए. बी. पाटील यांनी आॅक्टोबर २०१४ मध्ये यंत्रमाग कामगारांच्या किमान वेतनासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेच्या सुनावणीवेळी यंत्रमाग कामगारांच्या किमान वेतनाच्या फेररचनेची अधिसूचना ३० जानेवारी २०१५ पूर्वी घोषित करावी; अन्यथा २ फेब्रुवारी २०१५ ला होणाऱ्या उच्च न्यायालयातील सुनावणीमध्ये शासनाने आपले म्हणणे मांडावे, असे निर्देश उच्च न्यायालयाने शासनाला दिले. त्याप्रमाणे २ फेब्रुवारीला उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत ३० जानेवारीला यंत्रमाग कामगारांचे सुधारित किमान वेतन जारी केले असल्याचे सांगितले. त्याला तीन महिने उलटले तरी किमान वेतनाच्या अंमलबजावणीसाठी शासन कोणत्याही प्रकारचे प्रयत्न करीत नसल्याबद्दल कामगार संघटना पुन्हा आंदोलन उभे करीत आहे. शासनाला जाग यावी म्हणून २० मे रोजी राज्यातील यंत्रमाग कामगारांचा एक मोर्चा मुंबईत आझाद मैदान येथे काढणार आहे. त्याचबरोबर उच्च न्यायालयात सुद्धा शासनाच्या विरोधात अवमान याचिका दाखल करण्यात येणार असल्याची माहिती सिटूचे राज्य सचिव डॉ. डी. एल. कराड यांनी घोषित केले आहे.किमान पगार नऊ हजार ते दहा हजार शासनाच्या उद्योग व कामगार मंत्रालयाने २९ जानेवारीला यंत्रमाग कामगारांच्या किमान वेतनाची सुधारित अधिसूचना जाहीर केली असून, त्यामध्ये महापालिका, नगरपालिका व ग्रामीण अशी तीन परिमंडले घोषित केली आहेत. तर कामगारांमध्ये कुशल, अर्धकुशल आणि अकुशल अशी वर्गवारी केली आहे.महापालिका क्षेत्रात कामगारांसाठी अनुक्रमे १०,१०० रुपये, ९,५०० रुपये व ९,००० रुपये, नगरपालिका क्षेत्रासाठी ९,६०० रुपये, ९,००० रुपये आणि ८,५०० रुपये, तर ग्रामीण परिसराकरिता ८,५०० रुपये, ८००० रुपये व ७,५०० रुपये असे किमान वेतन जारी केले आहे. या वेतनाप्रमाणे जॉबर, यंत्रमाग कामगार, कांडीवाला, सायझर्स, वार्पर, फायरमन अशा विविध वर्गवारीच्या कामगारांना वेगवेगळा पगार मिळणार आहे.