शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

खासगी कंपनीकडून ‘स्ट्रक्चलर आॅडिट’

By admin | Updated: August 25, 2016 00:41 IST

‘शिवाजी’सह चार पुलांचा समावेश : राज्यातील १५ पुलांची होणार तपासणी

प्रवीण देसाई -- कोल्हापूर --ब्रिटिशकालीन ऐतिहासिक पुलांचे ‘स्ट्रक्चलर आॅडिट’ करण्यासाठी केंद्रीय रस्ते विकास मंत्रालयाने खासगी कंपनीची नियुक्ती केली आहे. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील शिवाजी पुलासह राज्यातील १५ पुलांची तपासणी होणार आहे. ही कंपनी पावसाळ्यानंतर आपल्या कामाला सुरुवात करणार आहे.महाड (जि. रायगड) येथील ब्रिटिशकालीन पुल ३ आॅगस्टला वाहून गेल्यानंतर जीवित आणि वित्तहानी झाली. याप्रकारामुळे राज्य सरकारला विरोधकांसह जनतेच्या रोषास सामारे जावे लागले. यानंतर खडबडून जागे झालेल्या सरकारने राज्यातील सर्वच पुलांचे स्ट्रक्चलर आॅडिट करण्याचे आदेश दिले. त्यामुळे राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारीत असलेल्या राज्यातील पन्नाशी पार केलेल्या सर्वच पुलांचे आॅडिट पावसाळ्यानंतर होणार आहे. राष्ट्रीय महामार्गावरील पूलही याला अपवाद नाहीत. या पुलांवर नियंत्रण असलेल्या केंद्रीय रस्ते मंत्रालयाकडून महाराष्ट्रातील ऐतिहासिक म्हणजे ब्रिटिशकालीन पुलांचे आॅडिट केले जाणार आहे. या संदर्भात काही दिवसांपूर्वी दिल्ली येथे संबंधित विभागाचे मंत्री व वरिष्ठ अधिकारी यांच्यात बैठक झाली. यामध्ये हे आॅडिट करण्यासाठी खासगी कंपनीची नियुक्ती करण्याचा निर्णय झाला. नियुक्ती करण्यात आलेली ही कंपनी सरकारच्या पॅनेलवरील आहे. या कंपनीच्या तज्ज्ञांकडून कोल्हापूर जिल्ह्यातील शिवाजी पुलासह शाहूवाडी तालुक्यातील मलकापूर, वारुळ व करंजोशी यांसह राज्यातील १५ ब्रिटिशकालीन पुलांची तपासणी केली जाईल. हे काम पावसाळा संपल्यानंतर सुरू होईल.ही कंपनी पुलांची पाहणी करणार असून, यामध्ये काही त्रुटी आढळल्यास उपायही सुचवून ते करण्याबाबतचा अहवाल तत्काळ केंद्र सरकारला सादर करणार आहे. याची प्रत संबंधित जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनाही दिली जाणार आहे. शिवाजी पुलासह जिल्ह्यातील चार पुलांची तपासणी करण्यासाठी महिन्याभरानंतर ही कंपनी कोल्हापुरात येणार आहे. पंचगंगा नदीवरील शिवाजी पुलासह जिल्ह्यातील अन्य चार पुलांचे महिन्याभरानंतर स्ट्रक्चलर आॅडिट होणार आहे. केंद्र सरकारने नियुक्त केलेल्या कंपनीकडून ते केले जाईल.- आर. के.बामणे, कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण,