शहरं
Join us  
Trending Stories
1
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
4
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
5
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
6
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
7
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
8
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
9
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
10
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
11
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
12
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
13
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
14
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
15
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
16
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
17
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
18
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
19
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...

कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची दमदार एंट्री

By admin | Updated: June 29, 2016 01:02 IST

सलग दुसऱ्या दिवशीही संततधार : उसासह सर्वच पिकांना जीवदान; शेतकरी सुखावला

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात मंगळवारी पावसाने दमदार एंट्री घेतली असून दिवसभर संततधार सुरू होती. सर्वत्र जोरदार पाऊस सुरू असल्याने उसासह सर्वच पिकांना जीवदान मिळाले आहे. सलग दुसऱ्या दिवशीही जिल्ह्यात पावसाची संततधार होती. गेले तीन दिवस वातावरणात कमालीचा गारठा असून, या पावसाने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. गगनबावडा, शाहूवाडी, राधानगरी, पन्हाळा, चंदगड, आजरा तालुक्यांसह उर्वरित तालुक्यांतही दमदार पाऊस सुरू असून असून, नद्यांच्या पाणीपातळीतही चांगलीच वाढ झाली आहेआजऱ्यात पावसाची संततधारआजरा : आजरा शहरासह तालुक्यात मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशीही पावसाची संततधार सुरू असून, सर्वत्र जोरदार पाऊस सुरू असल्याने उसासह सर्वच पिकांना जीवदान मिळाले आहे.तालुक्याच्या पश्चिम भागात जोरदार पाऊस सुरू असल्याने हिरण्यकेशी नदीच्या पाणीपातळीत वाढ होऊ लागली आहे. चित्री प्रकल्पक्षेत्रातही पावसाचा जोर वाढला आहे. सलग दोन दिवस पावसामुळे ऊस व भात पिकांसह सोयाबीन पिकालाही जीवदान मिळणार आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास भात रोप लावणीची कामे येत्या चार दिवसांत सुरू होण्याची शक्यता आहे. एकंदर पावसाच्या हजेरीने शेतकरी वर्गासह सामान्य माणूस सुखावला आहे. भादोले परिसरात पाऊसभादोले : भादोले परिसरात मंगळवारी सकाळपासून पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. गेले तीन दिवस वातावरणात कमालीचा गारठा असून, मंगळवारपासून सुरू झालेल्या पावसाने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला.तालुक्यात यंदा वळीव आणि मान्सूनच्या पावसानेही कमी प्रमाणात हजेरी लावली. वळीव पाऊस मे ऐवजी जूनच्या पहिल्या आठवड्यात काही प्रमाणात पडला. त्यानंतर मान्सूनच्या पावसाला सुरुवात झाली नाही. मंगळवारी सकाळपासून भादोले परिसरात हलक्या सरी बरसल्या. या पावसाने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.कागलमध्येही रिपरिपम्हाकवे : कागल तालुक्यात सोमवारी पावसाने दमदार एंट्री करत सरासरी १४ मि.मी. पावसाची नोंद झाली. सर्वाधिक बिद्री मंडलमध्ये २८ मि.मी. पावसाची नोंद झाली असून, सिद्धनेर्ली मंडलमध्ये सर्वांत कमी ०६ मि.मी. पाऊस झाला. या महिनाभरात अत्यल्प म्हणजेच १०८ मि.मी. पाऊस झाला आहे. गतवर्षी जून महिन्यात २२० मि.मी. पावसाची नोंद झाली होती. तालुक्यामध्ये कमीत कमी ६५० मि.मी. इतका पाऊस अपेक्षित असल्याने आगामी दोन महिन्यांत जोरदार पावसाची गरज आहे.जूनच्या पहिल्या आठवड्यात वळवाच्या हजेरीमुळे तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी भात, सोयाबीन, भुईमूग, आदी पिकांच्या पेरण्या पूर्ण केल्या. त्यानंतर चार-आठ दिवसांनी हलक्या स्वरूपात झालेल्या पावसामुळे या पिकांची उगवण झाली आहे. त्यामुळे या पिकांसह उसाला पावसाची नितांत गरज होती. मंगळवारीही पावसाची दिवसभर रिपरिप सुरूच होती. दरम्यान, सोमवारी दिवसभर मुरगूड मंडलमध्ये १५ मि.मी., कागल ११ मि.मी., केनवडे १६, सेनापती कापशी १०, खडकेवाडा ०८ मि.मी. अशी पावसाची नोंद झाली आहे.धामणी खोऱ्यात दमदार पाऊसम्हासुर्ली : लांबलेल्या मान्सूनने गेल्या दोन दिवसांपासून धामणी खोऱ्यात दमदार सुरुवात केल्याने बळिराजा सुखावला आहे. सात महिन्यांच्या दीर्घ विश्रांतीनंतर या खोऱ्याची जीवनदायीनी धामणी नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. या पावसाळ्यात प्रथमच दुथडी भरून वाहणारी ही जिल्ह्यातील पहिलीच नदी आहे. गेल्या चार महिन्यांपासून बंद असणाऱ्या नळ पाणीपुरवठा योजना सुरू होण्याची शक्यता असून, तीव्र पाणीटंचाईवर काहीसा दिलासा मिळणार आहे.