शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

रंकाळ्यासाठी जुजबी प्रयत्न

By admin | Updated: December 26, 2014 00:06 IST

जलपर्णीचा पुन्हा धोका : ५० टक्के ड्रेनेजलाईन बंदच; सांडपाण्यामुळे अवकळा

कोल्हापूर : रंकाळ्यात मिसळणाऱ्या शाम सोसायटी, सरनाईक कॉलनी, परताळा नाला, आदी ठिकाणांच्या मिळून तब्बल ११ ते १२ एमएलडी (दशलक्ष लिटर) मैलामिश्रित सांडपाण्यापैकी तब्बल १० एमएलडी सांडपाणी दुधाळी नाल्याकडे वळविल्याचा महापालिकेचा दावा फोल ठरल्यानेच पुन्हा रंकाळ्याला जलपर्णीचा धोका सतावू लागला आहे. रंकाळा तलावात अद्याप ५० टक्के सांडपाणी मिसळत आहे. यावर तातडीचे उपाय म्हणून महापालिकेने काल, बुधवारपासून जलपर्णी काढण्याचे काम हाती घेतले आहे. महापालिकेच्या गलथानपणामुळेच रंंकाळा अखेरची घटका मोजत आहे. रंकाळाप्रेमींतून याबाबत कमालीचा संताप व्यक्त होत आहे.राष्ट्रीय तलाव संवर्धन योजनेतून मिळालेल्या आठ कोटी निधीपैकी सव्वासहा कोटी रुपये खर्चून रंकाळा ते दुधाळी नाल्यापर्यंत ड्रेनेज लाईन टाकण्यात आली. गेली साडेचार वर्षे पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू होते. कासवगतीने सुरू असलेल्या कामामुळे रंकाळ्याचे दुखणे वाढतच गेले. पाईपलाईनमध्ये खरमाती अडकल्याने मोठ्या प्रमाणात सांडपाणी रंकाळ्यात मिसळू लागले. सांडपाण्याचे दृश्य स्वरूपातील परिणाम आता समोर येऊ लागले आहेत.रंकाळ्यात सरनाईक कॉलनीतून मिसळणारे पाणी रोखण्यासाठी मातीची पोती भरून दूषित पाणी वेगळे करण्याचा प्रयत्न महापालिकेने केला आहे. या पाण्याची मोठी दुर्गंधी सुटली आहे. याठिकाणी जलपर्णी वाढून हे पाणी आता रंकाळ्यात मिसळण्यास सुरुवात झाली आहे. आता जेसीबी यंत्राच्या साहाय्याने केंदाळ व जलपर्णी काढण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. सुरू असलेल्या या जुजबी प्रयत्नांवरच प्रशासनाची भिस्त असल्याने रंकाळा तलावाला पुन्हा मोठा फटका बसू शकतो, असे पर्यावरण अभ्यासकांचे मत आहे. (प्रतिनिधी)