शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

संवेदनशील गावात स्ट्रायकिंग फोर्स

By admin | Updated: April 22, 2015 00:26 IST

ग्रामपंचायत निवडणूक : सुरक्षेसाठी जिल्ह्यात १५०० पोलीस, ३५० गृहरक्षक तैनात

रत्नागिरी : जिल्ह्यातील ३३१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उद्या (बुधवार) मतदान होत आहे. राजकीय पक्ष अप्रत्यक्षरित्या या निवडणुकीत उतरले असून, कोणत्याही ठिकाणी कायदा व सुरक्षिततेला गालबोट लागू नये म्हणून निवडणूक होत असलेल्या ग्रामपंचायत क्षेत्रात दीड हजार पोलीस व साडेतीनशे गृहरक्षक (होमगार्ड्स) तैनात करण्यात आले आहेत.विशेषत: संवेदनशील असलेल्या सुमारे ३५ गावांसाठी वा अन्यत्र कोठेही काही घडण्याची शक्यता वाटल्यास १० स्ट्रायकिंग गु्रप्सही सज्ज ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीसाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे.जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. संजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्य वरिष्ठ अधिकारी निवडणूक काळातील सुरक्षिततेबाबत सतर्क असून, आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात ३३१ ग्रामपंचायतीत गाव पॅनेल्स निवडणूक आखाड्यात उतरली आहेत. त्याद्वारे ३९७३ उमेदवार निवडणूक रिंगणात असूून, ४ लाख १३ हजार २४३ मतदारांच्या हाती त्यांचे भवितव्य आहे. जिल्ह्यातील मतदान प्रक्रियेसाठी ५२८० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्यक्षात पक्षचिन्हांवर ही निवडणूक होत नसली तरी राजकीय पायाभरणी पुरेपूर झाली आहे. त्यामुळे निवडणुकीत चुरस आहेच, परंतु काही ठिकाणी राजकीय हेवेदावेही आहेत. रत्नागिरी, चिपळूण, खेड या तालुक्यातील काही ग्रामपंचायतींमध्ये राजकीय उलथापालथी मोठ्या प्रमाणात असून, त्यातून मतदानाच्या दिवशी व मतमोजणीच्यावेळी राजकीय वादंग निर्माण होऊ नयेत, तणाव निर्माण झालाच तर त्यावर नियंत्रण मिळविता यावे, या सर्व शक्यतांचा विचार करूनच हा कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्तासाठी रायगडमधून १००, ठाणे ग्रामीणमधून १००, तर पालघरमधून ३० पोलीस कर्मचारी तसेच या जिल्ह्यांतून प्रत्येकी चार पोलीस अधिकारीही जिल्ह्यात दाखल झाले आहेत. स्ट्रायकिंग फोर्सचे १३० कर्मचारी, जिल्ह्यातील १०६१ पोलीस कर्मचारी, १७ पोलीस निरीक्षक, ७० सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक, ३५० गृहरक्षक व जिल्हा पोलीस अधीक्षक तसेच अपर जिल्हा पोलीस अधीक्षक, ४ उपविभागीय पोलीस अधिकारी असा ताफा या निवडणुकीचा बंदोबस्त सांभाळणार आहे. जिल्ह्यातील संवेदनशील ग्रामपंचायतींच्या ठिकाणी विशेष लक्ष दिले जाणार आहे.जिल्हाभरातील या कडक बंदोबस्तामुळे जिल्ह्यात अत्यंत शांततेच्या वातावरणात निवडणूक प्रक्रीया पार पडेल, असा विश्वास जिल्हा प्रशासनाकडून व्यक्त करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)जिल्ह्यातील ३५ गावांवर करडी नजररत्नागिरीतील नाचणे ग्रामपंचायत निवडणुकीत राजकीय वर्चस्वाची लढाई असून, याआधी युतीत असलेले शिवसेना व भाजपा हे पक्ष आमने-सामने ठाकले आहेत. भाजपाचे रत्नागिरी तालुकाध्यक्ष या गावचे असून, त्यामुळे दोन्ही पक्षांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. आरोप-प्रत्यारोपांनी प्रचार रंगलेला असल्याने याठिकाणी पोलिसांकडून दक्षता घेतली जात आहे. कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. स्ट्रायकिंग फोर्सचे दहा गु्रप्स शस्त्रसज्ज निवडणूक मतदानाच्या काळात जिल्ह्यात कोठेही तणावाचे वातावरण निर्माण झाले किंवा कायदा व सुव्यवस्थेला बाधा निर्माण होण्याची शक्यता वाटली तर त्यासाठी स्ट्रायकिंग फोर्स १० गु्रप्स शस्त्रसज्ज ठेवण्यात आले आहेत. या पोलिसांकडे आवश्यक शस्त्रे, दारूगोळा, अश्रूधुराच्या नळकांड्या व अन्य आवश्यक सामग्री असते. मात्र, संवेदनशील गावे असली तरी निवडणूक शांततेत होईल, असा विश्वास पोलीस सुत्रांनी व्यक्त केला आहे.