गारगोटी शहरात लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर नाक्यावर कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. तर अनावश्यक फिरणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई सुरू आहे. त्यामुळे शहरात नागरिकांची तुरळक गर्दी दिसत होती.
गारगोटी शहरातील मराठा चौक, क्रांती चौक, गडहिंग्लज रोड परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. शहरात येणाऱ्यांची चौकशी करून अत्यावश्यक असल्यासच त्यांना पुढे सोडले जात होते. विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारून त्यांना माघारी पाठविले जात होते. अत्यावश्यक सेवेत असलेली दुकाने उघडी असून बंदोबस्त असल्यामुळे त्या ठिकाणी तुरळक गर्दी होती. नेहमी गजबजलेल्या शहरास आज निर्मनुष्य रस्त्यांमुळे अवकळा आली होती.
फोटो ओळ :
गारगोटी- भुदरगड येथे नाकाबंदी करताना पोलीस निरीक्षक संजय मोरे, पोलीस कर्मचारी.