शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

वाहतुक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कडक मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:38 IST

कोल्हापूर : शहरात वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांविरोधात आता शहर वाहतूक नियंत्रण शाखेने कडक कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली आहे. वाहतुकीचे ...

कोल्हापूर : शहरात वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांविरोधात आता शहर वाहतूक नियंत्रण शाखेने कडक कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली आहे. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनधारकाच्या नावावर ई-चलनद्वारे दंडाची रक्कम पडते. वाहनधारकाच्या मोबाईल नंबरची प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे नोंद नसल्यास वाहनधारक दंडाबाबत अनभिज्ञ असतात, वारंवार नियम मोडल्यास दंडाची रक्कम वाढत जाते. त्यामुळे प्रत्येक दंडाबाबत मोबाईलवर संदेश पाठवला जाणार आहे. परंतु, त्यासाठी मोबाईल क्रमांकाची नोंद प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे असणे गरजेचे आहे. आपल्या मोबाईल क्रमांकाची नोंद प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे करावी, असे आवाहन शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलीस निरीक्षक स्नेहा गिरी यांनी केले आहे.

उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार रस्ते अपघातांचे प्रमाण पाच वर्षात ५० टक्क्यांनी कमी करण्याचे उद्दिष्ट निश्‍चित करण्यात आले. त्यासाठी कोल्हापूर शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून विविध उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. बेशिस्त वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी मोटर वाहन कायद्यानुसार कारवाई करण्याच्या उद्देशाने विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई सुरू झाली आहे. नव्या मोटरवाहन कायद्यानुसार आता दंडाची रक्कम दहापटीने वाढली आहे. त्यामुळे वाहनधारकांनी सतर्क राहावे, नियम मोडणार्‍या वाहनधारकांची ई - चलनद्वारे नोंद घेऊन, त्यांच्या नावावर दंडाची रक्कम जमा होते. अनेक वाहनधारकांना याबाबत माहिती नसते. वारंवार नियम मोडल्यास वाहनधारकाच्या नावावर दंडाची रक्मक वाढत जाते. ती त्याला एकदम भरणे शक्य होत नाही. या अडचणी टाळण्यासाठी वाहनधारकांनी स्वत:च्या मोबाईल क्रमांकाची नोंद प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे करावी, असे आवाहन पोलीस निरीक्षक गिरी यांनी केले आहे.