शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

‘ओव्हरलोड’ वाहतुकीचा शिरोळच्या रस्त्यांना ताण

By admin | Updated: January 6, 2016 00:44 IST

कोट्यवधी रूपयांचे रस्ते खड्ड्यात : प्रादेशिक परिवहन विभागाचे दुर्लक्ष

जयसिंगपूर : शिरोळ तालुक्यात ओव्हरलोड वाहतुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या वाहतुकीमुळे कोट्यवधी रुपये खर्च केलेले रस्ते खराब होत आहेत. बॉक्साईट, वाळू, माती, वीट, कोळसा, लाकूड याची बिनदिक्कतपणे प्रमाणापेक्षा अधिक वाहतूक होत आहे. प्रादेशिक परिवहन विभागाच्या दुर्लक्षामुळेच ही वाहतूक होत असल्याची चर्चा आहे.सांगली जिल्हा आणि कर्नाटक सीमा भागाशी निगडित असणारा शिरोळ तालुका दळणवळणाच्या दृष्टिकोनातून वाहनधारकांना सोयीस्कर ठरला आहे. कर्नाटकातून चोरटी वाहतूक या भागात मोठ्या प्रमाणात होत आहे. सध्या प्रमाणापेक्षा अधिक वाहतूक करणारी वाहनांची संख्या वाढली आहे. यावर स्थानिक पोलीस ठाण्याचे वाहतूक पोलीस ‘चिरीमिरीत’ गुंतले असल्याचे चित्र आहे. तालुक्यात वीटभट्टीबरोबरच माती, वाळू, दगड व्यवसाय मोठ्या प्रमाणात आहेत. कर्नाटकातून बॉक्साईट, लाकूड वाहतूकही तालुक्यातून होते. अवजड वाहनांमुळे कोट्यवधी रुपये खर्च करून बनविलेल्या रस्त्यांची दुर्दशा होत आहे. स्थानिक पोलिसांबरोबर प्रादेशिक परिवहन विभागाचे या वाहतुकीकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष होत असल्यामुळेच अशी वाहतूक फोफावली आहे. एखादी अपघाताची मोठी घटना घडल्यानंतरच कारवाईचे सोंग संबंधित विभागाकडून घेतले जाते, ही वस्तुस्थिती आहे. मात्र, पुन्हा ‘येरे माझ्या मागल्या’प्रमाणे अशी वाहतूक पुन्हा सुरू होते. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या अशा वाहनांवर ठोस कारवाई करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.महसूल लाखात; नुकसान कोटीतवाळू, वीट, माती, दगड यातून शासनाला महसूल मिळतो. ज्या गावातून खनिज उत्खनन केले जाते त्या ठिकाणी लाखो रूपयांत महसूल मिळतो. एकूणच खनिज उत्खननातून मिळणारा महसूल आणि कोट्यवधी रूपये खर्च करून तयार करण्यात आलेले रस्ते याचा विचार करता महसूल लाखात आणि रस्त्यांचे नुकसान कोटीचे अशी परिस्थिती आहे. लोकप्रतिनिधींनी प्रशासनावर अंकुश ठेवल्यास अशा वाहतुकीला आळा बसणार आहे. कर्नाटक, सांगलीतून वाहतूकसांगली जिल्ह्यातील मिरज-अर्जुनवाड हद्दीतून तर कर्नाटकातून कागवाड-गणेशवाडी, जुगुळ-आलास, एकसंबा-जुने दानवाड, मलिकवाड-दत्तवाड, बोरगाव-हेरवाड या मार्गावरून शिरोळ तालुक्यात मोठ्या प्रमाणात वाहतूक होते. ओव्हर लोड वाहतूक करण्यासाठी सोयीस्कर रस्ते असल्यामुळे कर्नाटकातील वाळू, बॉक्साईट, विटांची प्रमाणापेक्षा जास्त वाहतूक राजरोसपणे होत आहे. ओव्हरलोड वाहतूक करणाऱ्या वाहनावर नंबर प्लेटच नाहीत, याकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे.