शहरं
Join us  
Trending Stories
1
महसूल मंत्र्यांचा दुय्यम निबंधक कार्यालयातच छापा; अधिकाऱ्यांच्या ड्रॉवरमध्ये आढळले पैसे
2
सरन्यायाधीशांवर वकिलाकडून बूट फेकण्याचा प्रयत्न ; ‘सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही’ अशा घोषणा देत कोर्ट सुरू असतानाच केला हल्ला 
3
कोणत्या नगरपरिषद, नगरपंचायतीसाठी कोणते आरक्षण; सोडत निकाल वाचा एका क्लिकवर... 
4
वांगचूक यांना अटक; केंद्र सरकार, लडाखला नोटीस; तत्काळ सुटका करण्याची सर्वोच्च न्यायालयात मागणी 
5
बिहार विधानसभेचा बिगुल अखेर वाजला; दोन टप्प्यांत मतदान, तर १४ नोव्हेंबरला निकाल   
6
मुंबई महापालिकेची अंतिम प्रभागरचना मंजूर; निवडणूक प्रक्रियेला वेग, मतदार याद्यांची प्रतीक्षा 
7
२४७ नगरपरिषदांमध्ये १२५ नगराध्यक्षपदे महिलांसाठी; तर १४७ नगरपंचायतींमध्ये ७३ महिलांसाठी राखीव 
8
ब्रुनको, रॅम्सडेल व साकागुची यांना मेडिसिनचे नोबेल; टी-पेशींचा शोध, कर्करोग आणि मधुमेहावर उपयुक्त
9
७ कोटींच्या घरांना ग्राहक मिळाले नाहीत, तर म्हाडा घरे भाड्याने देणार
10
लादेनच्या डोक्यात अमेरिकी नेव्ही सीलनेच गोळी झाडली होती, हे इतिहास विसरणार नाही : ट्रम्प
11
तरुणाई ठरवणार बिहारचा मुख्यमंत्री?
12
विशेष न्यायालयाचा दोघांची सुटका करण्यास नकार; बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण, सरकारी वकिलांची माहिती  
13
अपहरण केले, पण चांगले खायला दिले; दिलीप खेडकरचा असाही बचावात्मक पवित्रा
14
परप्लेक्सिटीचा तांत्रिक बिघाड सोडवला, १ कोटीची नोकरी मिळाली; पालघर जिल्ह्यातल्या जितेंद्रची झाली निवड
15
पालकांचा सांभाळ मुलांनी केलाच पाहिजे; बक्षिसपत्राविषयी उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
16
अतिवृष्टीचे निकष बदलून शेतकऱ्यांना करणार मदत; बुजलेल्या विहिरींनाही मदतीचा प्रस्ताव
17
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
18
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
19
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
20
महिला वनडे वर्ल्ड कपच्या इतिहासात दुसऱ्यांदा असं घडलं; न्यूझीलंडसह सुझीच्या नावे लाजिरवाणा विक्रम

स्त्रीशक्ती एकवटली...

By admin | Updated: March 9, 2016 00:54 IST

महिलांच्या स्वावलंबनासह आत्मविश्वासाला सलाम करण्यासाठी ‘जागतिक महिला दिना’निमित्त महानगरपालिका आणि डॉ. डी. वाय. पाटील कला, क्रीडा, शैक्षणिक व सांस्कृतिक ट्रस्टतर्फे आयोजित रॅलीचे.

कोल्हापूर : कर्तृत्वाचे पंख लेऊन विविध क्षेत्रांत गगनभरारी घेणाऱ्या महिलांनी एकजुटीसह भारतीय संस्कृतीचे घडविलेले दर्शन मंगळवारी सकाळी गांधी मैदान येथे पाहावयास मिळाले. निमित्त होते, महिलांच्या स्वावलंबनासह आत्मविश्वासाला सलाम करण्यासाठी ‘जागतिक महिला दिना’निमित्त महानगरपालिका आणि डॉ. डी. वाय. पाटील कला, क्रीडा, शैक्षणिक व सांस्कृतिक ट्रस्टतर्फे आयोजित रॅलीचे. या अनोख्या रॅलीचे उद्घाटन आमदार सतेज पाटील आणि महापौर अश्विनी रामाणे यांच्या हस्ते फुगे सोडून करण्यात आले. याप्रसंगी उपमहापौर शम्मा मुल्ला, करवीर आदर्श महिला औद्योगिक सहकारी संस्थेच्या अध्यक्षा प्रतिमा पाटील, डी. वाय. पाटील शिक्षण संस्थेचे ट्रस्टी ऋतुराज पाटील, वैजयंती पाटील, राजश्री काकडे, स्मिता जाधव यांच्यासह महानगरपालिकेचे नगरसेवक व पदाधिकारी प्रमुख उपस्थित होते. ‘स्त्रीभ्रूण हत्या’, ‘शून्य गाठायचे आहे’, महाराष्ट्रातील जैवविविधता, स्त्री-पुरुष समानतेचा संदेश, जन्मकुंडली बघण्यापेक्षा वधू-वरांची एचआयव्ही तपासणी करा, असा सामाजिक संदेश घेऊन रणरागिणी गांधी मैदानात अवतरल्या. दरम्यान, डॉ. अल्पना चौगुले यांनी कोल्हापूरची महती सांगणारा पोवाडा गाऊन कार्यक्रमास नवचैतन्य आणले. शेफाली मेहता व ग्रुपच्या झुंबा डान्सने सर्वांचे लक्ष वेधले आणि महिलांना आपल्या तालावर डोलण्यास भाग पाडले. यावेळी प्रत्येक ग्रुपच्या वेगळेपणाचे तज्ज्ञ परीक्षकांमार्फत परीक्षण करण्यात आले. त्यानंतर रॅलीस प्रारंभ झाला. निवृत्ती चौक, बिनखांबी गणेश मंदिर, मिरजकर तिकटीमार्गे खासबाग येथील केशवराव भोसले नाट्यगृह येथे रॅलीची सांगता झाली.

यांचा सहभाग...लोकमत सखी मंच, संवेदना गु्रप, गार्डन्स क्लब गु्रप, आदिशक्ती, वाडकर गल्ली (कसबा बावडा), अस्तित्व गु्रप, एकटी व अवनि संस्था, जीकेजी गु्रप, केआयटी, इंडियन वुमेन अहेड, स्नेहांकिता म. मंडळ जरगनगर, वीर कक्कया विद्यालय, बावडा गु्रप मराठा कॉलनी, उंच भरारी स्त्री शक्ती गु्रप, न्युट्री शनिस्ट गु्रप, गव्हर्न्मेंट पॉलिटेक्निक गर्ल्स अँड स्टाफ, न्यू लॉ कॉलेज, केआयटी कॉलेज इंजिनिअरिंग, रणरागिणी गु्रप, आराध्या ग्रुप, डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज विद्यार्थिनी, कॉलेज स्टाफ, तवनाप्पा पाटणे, प्रिन्सेस पद्माराजे ज्युनिअर कॉलेज, जिवो गु्रप, अनुकामिनी गु्रप, क्लसिक गु्रप आदींचा सहभाग होता.गुलाबी गँग...नगरसेवक राहुल माने व नगरसेविका इंदुमती माने आपल्या प्रभागातील महिलांसह गुलाबी रंगाची साडी व फेटे परिधान करून मोठ्या कंटेनरसह रॅलीत सहभागी झाले होते. कंटेनरवर सर्व स्तरांत महिलांनी केलेल्या प्रगतीचा आढावा घेणारा सजीव देखावा साकारला होता. रॅलीतील ही गुलाबी गँग आकर्षण ठरल्याची चर्चा दिवसभर शहरात सुरू होती.मोटारसायकल, जीप...रॅलीमध्ये अनेक महिला व मुली बुलेटसह मोपेड घेऊन उत्साहाने सहभागी झाल्या होत्याच, पण त्यासोबत पुरुषांची मक्तेदारी असणारी ओपन टप जीप घेऊनही महिला आल्या होत्या.